Bhumika Temple: धार्मिक विधीवरुन गोव्यात पुन्हा वाद; होळी कोण पेटवणार यावरुन भूमिका देवस्थानत दोन गट आमने-सामने, काहींना मारहाण

Morjim Temple Dispute: आश्वे मांद्रे येथील श्री भूमिका देवस्थान महाजन व गावकऱ्यांत दोन गट पडले असून धार्मिक उत्सव धार्मिक विधी कोणी करावा? यावरून सध्या वाद सुरू आहे.
Morjim
MorjimDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: आश्वे मांद्रे येथील श्री भूमिका देवस्थान महाजन व गावकऱ्यांत दोन गट पडले असून धार्मिक उत्सव धार्मिक विधी कोणी करावा? यावरून सध्या वाद सुरू आहे. आज होळीच्या निमित्ताने दोन्ही गटांनी मंदिरासमोर होळी पेटवण्यासाठी जमवाजमव केली. आणि होळी कोणी घालावी? यावरून दोन्ही गटांत शाब्दिक चकमक उडाली. काही प्रमाणात मारहाणही एकमेकांना करण्यात आली.

या घटनेची माहिती मांद्रे पोलिसांना मिळताच, तातडीने मांद्रे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शिवाय पेडणे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनीही घटनास्थळी धाव घेतली. देवस्थान पंचायतन अध्यक्षांनी एका गटाला होळी घालण्याच्या दिलेल्या संमतीनुसार एका गटाला होळी घालण्यास उपजिल्हाधिकाऱ्यांनीही तात्पुरती संमती दिली.

आणि हा वाद मिटवण्यात आला. परंतु दोन्ही गटांत सुरुवातीला बरीच शाब्दिक चकमक काही प्रमाणात एकमेकांना मारहाणही झाल्याचे दिसून आले. दोन्ही गटांनी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार नोंदवली नव्हती.

यासंदर्भात मांद्रे पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी सांगितले,की अजून लेखी स्वरूपाची एकाही गटाकडून तक्रार आलेली नाही.

पेडणे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांच्याकडे संपर्क साधला असता आपण घटनास्थळी गेल्यानंतर दोन्ही गटांशी चर्चा करून यावर तात्पुरता तोडगा काढलेला आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com