Homeless in Goa Dainik Gomantak
गोवा

रस्त्यांवरील निराधारांसाठी म्हापशात आश्रम

‘जीवन आनंद संस्थे’चा उपक्रम, पेडे येथे 16 फेबुवारी मार्चला आश्रमाचं उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

म्हापसा : म्हापसा शहरातील रस्त्यांवर असलेल्या निराधार बांधवांसाठी महाराष्ट्रातील ‘जीवन आनंद संस्थे’तर्फे आश्रम साकारत असून, पेडे-म्हापसा येथील जिल्हा इस्पितळाच्या बाजूला सायमन अंकल यांच्या मालकीच्या वास्तूत त्याचे उद्‍घाटन 16 मार्चला होणार आहे. (Ashram for Homeless People News Updates)

जोपर्यंत म्हापशातील (Mapusa) निराधार बांधवांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा संकल्प म्हापसा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा निर्धार जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब यांनी केला होता. त्या दृष्टीने कार्यसिद्धी व संकल्पपूर्तीसाठी ते प्रयत्नशील असून अजूनही अनवाणी फिरतात.

जीवन आनंद संस्था रस्त्यांवरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र व गोव्यात कार्यरत आहे. या संस्थेचे आश्रम सिंधुदुर्गमधील कुडाळ येथे तसेच गोव्यात (Goa) फोंडा तालुक्यात कार्यरत आहेत. दरम्यान. संदीप परब हे स्वत: 23 व 24 फेब्रुवारी रोजी प्रत्येकी चार तास म्हापशातील पदपथावर बसून निराधार बांधवांच्या समस्या जाणून घेतील, तसेच जनजागृतीच्या या विषयाचे गांभीर्यही तमाम लोकांना करून देणार आहेत.

नागरिकांना रस्त्यावरून विमुक्तपणे चालायला मिळायला हवे, यासाठी रस्त्यावरील निराधारांच्या पुनर्वसनासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हातभार लावावा, असे आवाहन परब यांनी केले.ते म्हणाले, यासंदर्भात जनजागृतीची गरज असून, हा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांना तो विषय स्वत:चाच वाटायला हवा. भीक देणे बंद झाले पाहिजे. निराधारांना फक्त जेवण देऊन त्यांची समस्या सुटत नाही. त्यांचे पुनर्वसन होणेही गरजेचे आहे.

व्यवसायाने शिक्षिका असलेल्या संस्थेच्या कार्यकर्त्या पूनम बुर्ये म्हणाल्या, म्हापसा शहरातीत एकही बांधव रस्त्यावर राहू नये, म्हणून जीवन आनंद संस्था कार्यरत आहे. रस्त्यावरील बांधवांच्या पुनर्वसनासाठी मानवतेच्‍या दृष्टिकोनातून सर्वदूर प्रयत्न व्हावेत, हीच आमची इच्छा आहे. म्हणूनच आम्ही म्हापसा शहराची निवड केली आहे. रस्त्यावरील निराधार बांधवांना आधार व्हावा व कोणीही या शहरात रस्त्यावर राहायला येऊ नये आणि प्रत्येकाला आपल्या हक्काचा आसरा मिळावा ,हा आमचा प्रयत्न असणार आहे.

जीवन आनंद संस्थेने आपल्या आवाहन पत्रात नमूद केले आहे, की प्रत्येक वसाहतीतील समाजाभिमुख व्यक्तींनी स्वत:च्या परिसरात बकालपणा दिसू नये ,म्हणून काम करावे व परिसर स्वच्छ ठेवावा. रस्त्यावर कोणी निराधार दिसला तर मानवतेच्‍या दृष्टिकोनातून स्थानिक पोलिसांना कळवावे. पुरेसा वेळ हाताशी असेल तर पोलिसांच्‍या (Police) मदतीने रस्त्यावरच्या व्यक्तींना त्यांच्‍या राहत्या घरी नातेवाइकांचा शोध घेऊन पाठवावे किंवा आश्रमात न्यावे. रस्त्यावरील बांधवांना तुम्ही जेवण, पांघरूण मानवतेच्‍या दृष्टीने देत असताच; पण, आता या शहरात कोणीही निराधार आणि विना आश्रय असू नये म्हणून प्रयत्न करायचे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT