Ashma B When BJP ministers are involved in sex scandals how will women in the state get security Dainik Gomantak
गोवा

BJP मंत्री सेक्स स्कँडल्समध्ये गुंतले असताना, राज्यातील महिलांना सुरक्षा कशी मिळणार?

जेव्हा एक भाजप मंत्री एका महिलेचे लैंगिक शोषण करत आहे आणि संपूर्ण राज्यात ही बातमी पोहचली आहे, हे माहित असुनही भाजप महिला मोर्चा या मुद्द्यावर गप्प का

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोवा प्रदेश काँग्रेस (Congress) समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी उघडकीस आणलेल्या सेक्स स्कँडलच्या घटनेचा संदर्भ देत गोवा फॉरवर्ड पक्षाचे (GFP) उपाध्यक्ष अ‍ॅड. अश्मा बी (Ashma B) यांनी या भाजप (BJP) मंत्र्याला तातडीने मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी केली आहे. अ‍ॅड अश्मा बी यांनी आज नगरसेवक निमिषा फालेरो यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली.

"भाजपच्या मंत्रिमंडळात हा मंत्री अजुनही असल्याने या पक्षात नैतिकता नसल्याचे सिद्ध होते. जेव्हा एक भाजप मंत्री एका महिलेचे लैंगिक शोषण करत आहे आणि संपूर्ण राज्यात ही बातमी पोहचली आहे, हे माहित असुनही भाजप महिला मोर्चा या मुद्द्यावर का गप्प आहे." असा प्रश्न अश्मा यांनी केला आहे.

पणजी पोटनिवडणुकीनंतर, त्यांना बलात्काऱ्याच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळत आहे, यासाठी त्या मूक झाल्या आहेत का? असा प्रश्न त्यांनी भाजप महिला मोर्चाला केला आहे. या घटनेविरोधात आवाज उठवणाऱ्या भाजपचे आमदार कार्लोस आल्मेदा यांनाही या घटनेबाबत स्पष्टीकरण देण्यास आणि मंत्र्याचे नाव घेण्यास त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घेतलेल्या मुद्द्यावर आपला पक्ष त्यांच्या बरोबर आहे.

"गुन्ह्यात भागीदार असलेल्या आणि स्वतःच्या मंत्र्याचे संरक्षण करणाऱ्या भाजप सरकारकडून महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा कशी करता येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सेक्स स्कँडलमध्ये असलेल्या या मंत्र्याला तत्काळ काडून टाकावे." अशी मागणी अश्मा यांनी आज पत्रकार परीषदेत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina: चोरांनी केली मारहाण, तरीही खिडकीतून पळाली! बायणा दरोड्यात 15 वर्षीय मुलीने वाचवले कुटुंबाचे प्राण; पुरस्कारासाठी शिफारस

अग्रलेख: ..दोनापावला, म्हापसा आणि आता बायणा! दरोड्यांच्या मालिकेने 'गोव्याची शांतता' छिन्नविच्छिन्न केली आहे

Birsa Munda: भगवान बिरसा मुंडा 'मानवतेचे प्रतीक' होते, या विचाराला केंद्रस्थानी ठेवून तवडकर यांनी जो मार्ग दाखवला तो गोवाभर पसरला आहे

Goa Diabetes Ranking: मधुमेहात गोवा देशात अव्वल! डॉ. कामत यांचा दावा; तरुणांमध्ये वाढते प्रमाण चिंताजनक

Zuarinagar Fire: भल्या पहाटे गोदामं पेटली! झुआरीनगरात खळबळ; कोट्यवधींच्या नुकसानीची शक्यता

SCROLL FOR NEXT