Ashadhi Ekadashi Goa Dainik Gomantak
गोवा

Vitthal Temple Goa: विठ्ठलापुरात भरला भक्तांचा मेळा! पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी; CM सावंतांकडून श्रींच्या मूर्तीवर अभिषेक

Ashadhi Ekadashi Goa: ‘गोव्याचे प्रतिपंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठलापूर-साखळी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त रविवारी भाविकांचा मेळा भरला.

Sameer Panditrao

साखळी: ‘गोव्याचे प्रतिपंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठलापूर-साखळी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त आज रविवारी भाविकांचा मेळा भरला. पहाटे ५ वाजता आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीवर पहिला अभिषेक करण्यात आला. त्‍यानंतर भाविकांसाठी स्वहस्ते अभिषेकाला प्रारंभ झाला. राज्‍याच्‍या विविध भागातून विठूनामाचा गजर करत पायी चालत आलेल्या वारकरी पथकांनी विठुरायाच्या गजराने विठ्ठलापूर परिसर दणाणून सोडला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह मंदिरात उपस्थित राहून श्रींच्या मूर्तीवर अभिषेक केला. तसेच गोमंतकीयांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत सर्वांच्या सुख-शांतीसाठी प्रार्थना केली. सकाळपासून संध्‍याकाळपर्यंत हजारो भाविकांनी उपस्थिती लावून श्रींचे दर्शन घेतले.

विशेष म्हणजे रविवार हा सुट्टीचा असल्याने सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविकांनी श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी मंदिराच्या परिसरात लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. आमदार प्रेमेंद्र शेट, डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्‍यासह अनेक लोकप्रतिनिधींनी श्रींचे दर्शन घेऊन गोमंतकीयांना आषाढी एकादशीच्या शुभेच्‍छा दिल्‍या.

सर्वांच्या कल्‍याणासाठी प्रार्थना, मुख्यमंत्री

ज्या लोकांना पंढरपूर वारी करणे शक्य होत नाही, ते लोक मोठ्या भक्तिभावाने विठ्ठलापूर-साखळीच्या या प्रतिपंढरपुरात पायी वारी करून येतात व श्रीचरणी आपली सेवा रुजू करतात. आषाढी एकादशीनिमित्त आपणही श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करून गोमंतकीय तसेच देश-विदेशातील सर्व संकटे दूर होऊन सर्वांना सुख शांती लाभो अशी प्रार्थना केली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मंगळवारी होणार चिखलकाला

मोठी गर्दी होणार हे गृहीत धरून देवस्थान व्यवस्थापन समितीने गैरसोय होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था केली होती. मंदिरात लोकांना व्यवस्थित येऊन श्रींचे मुखदर्शन घेता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्‍यात आली होती. सकाळीच साखळीच्‍या जवळच्‍या भागातून तसेच होंडा, वाळपई, केरी, मोर्ले, पर्ये, डिचोली, कारापूर व इतर ठिकाणाहून शेकडोंच्या संख्येने वारकरी येऊन धडकले. दर्शनासाठी सकाळी लागलेली रांग संध्याकाळी उशिरापर्यंत सुरूच होती. दरम्‍यान,

मंगळवारी साखळीतील या प्रसिद्ध देवस्‍थानचा चिखलकाला साजरा करण्यात येणार आहे, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष उदयसिंग राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT