Ashadhi Ekadashi 2023  Dainik Gomantak
गोवा

Ashadhi Ekadashi 2023 : डिचोली शांतादुर्गा देवस्थानात पारंपरिक कार्यक्रम रंगले

‘आषाढी एकादशी’ उत्साहात : केळीच्या गाभ्यापासून केली देवीच्या मखराची सजावट

गोमन्तक डिजिटल टीम

bicholim : भजनाचा गजर आणि अन्य पारंपरिक कार्यक्रमांसह गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात ‘आषाढी एकादशी’ उत्सव साजरा करण्यात आला. श्री शांतादुर्गा देवस्थान ग्रामस्थ गावकर मंडळ ट्रस्टतर्फे हा उत्सव साजरा करण्यात आला.

सकाळी देवीस अभिषेक आदी विधी पार पाडल्यानंतर देवीला लुगडे आणि सुवर्णालंकारांनी सजविण्यात आले. केळीच्या गाभ्यापासून मखर सजावट करण्यात आली होती. ‘आषाढी’निमित्त देवीच्या भक्तगणांनी देवीच्या चरणाकडे आपली सेवा अर्पण केली. सकाळपासून मंदिरात भक्तीमय वातावरण पसरले होते.

दुपारी चार चौगुले ग्रामस्थ गावकर मंडळीकडून समई प्रज्वलित केल्यानंतर चोवीस तासांच्या अखंड भजनी सप्ताहाला प्रारंभ झाला. दुपारपासून मंदिरात भजनाचा गजर घुमत होता. ग्रामस्थ गावकर मंडळाच्या भजनाने सप्ताहाला प्रारंभ झाला. नंतर महिला आणि पुरुष भजनी पथकांतर्फे भजन सादर करण्यात आले.

आज सांगता

शुक्रवारी (ता.३०) दुपारी १२.३० वा. ग्रामस्थ गावकर, भाविक व महिला दिंडी पथकासह श्री विठ्ठलनामाच्या गजराने मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालणार आहेत. मंदिरात आल्यानंतर पुजाऱ्यांकडून देवीस व पंचायतन देवदेवतांना नैवेद्य, आरती, गाऱ्हाणे व तीर्थप्रसाद होणार आहे. रात्री पुराण वाचन, धुपारती आदी विधी झाल्यानंतर भजनी सप्ताहाची सांगता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT