Goa DGP  Dainik Gomantak, Canava
गोवा

Goa DGP: पोलिस महासंचालकांवर काहीच कारवाई नाही; सरकार संशयाच्या घेऱ्यात

Asgaon House Demolition Case: पोलिस महासंचालकांनी काही घडलेलेच नाही असे ठरवून आपला दिनक्रम जारी ठेवला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबाचे घर मोडण्यास साहाय्‍य करण्यास पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी केवळ आदेश दिला नाही तर आपल्याला धमकावले, असा आरोप हणजुणेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रशल देसाई यांनी केल्यानंतरही राज्य सरकार महासंचालकांवर कारवाई करू शकले नाही.

राज्याच्या मुख्य सचिवांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबत कळवून आठवडा उलटला तरी महासंचालकांची इतरत्र बदली सोडाच त्यांच्याकडचे अधिकार काढून घेण्याची हिंमतही राज्य सरकार दाखवू शकलेले नाही.

पोलिस महासंचालकांची दोन दिवसांत बदली होईल असे सांगून सरकार वेळ काढत आहे. आज मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी घेतलेल्या मंत्री व आमदारांच्या दोन वेगवेगळ्या बैठकांतही पोलिस महासंचालकांचा विषय चर्चेला आला होता. त्यावेळीही दोन दिवसांत बदलीचा आदेश येईल असे सांगत हा विषय गुंडाळण्यात आला.

पोलिस महासंचालकांनी मात्र जणू काही घडलेलेच नाही असे ठरवून आपला सामान्य दिनक्रम जारी ठेवला आहे. त्यांनी पर्वरीत सशस्त्र पोलिस दलाची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सोडवण्याचे आश्वासन दिले. फोंडा व मडगावला भेट देऊन तपास कामासंदर्भात मार्गदर्शन केले. नव्या तीन कायद्ये लागू करण्याच्या दिवशी राज्याच्या मुख्य सचिवांनाच पाचारण करून कार्यक्रमही साजरा केला.

दरम्यान, रजेवर असलेले महानिरीक्षक ओमवीरसिंह बिष्णोई अद्याप हजर झालेले नाहीत. त्यांची रजा १४ जुलैपर्यंत आहे. ते हजर झाल्यावर पोलिस महासंचालकपदाचा ताबा त्यांच्याकडे सोपवला जाईल असे सांगण्यात येते. मात्र सोमवारपासून (ता.१५) विधानसभा विधानसभा अधिवेशन सुरू होणार असल्याने त्यावेळी या विषयावरून विरोधकांकडून सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधी महासंचालकांच्या बदलीसाठी सरकारची धडपड सुरू आहे. परंतु अद्याप त्यात त्यांना सरकारला यश आलेले नाही.

सरकारी यंत्रणेला हे आव्‍हानच!

एवढे सगळे होऊनही ते रजेवर गेलेले नाहीत. खासगी कामासाठी एका दिवसात दिल्लीत जाऊन ते परत आले. त्यांनी आपण जणू काहीच केलेलेच नाही तर सरकार त्यांना अडकवू पाहत आहे, असे वातावरण तयार करण्यास सुरूवात केली आहे. काहींनी तर त्यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमांवर पोस्ट व व्हिडिओही टाकले आहेत. एकंदरीत त्यांनी सरकारी यंत्रणेला आव्हान दिल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. त्यांची बदली होईपर्यंत सरकार मात्र संशयाच्या घेऱ्यातच राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT