Pooja sharma  Dainik Gomantak
गोवा

Asgaon House Demolition Case: चेहरा झाकून अवतरली; पूजाची २ तास चौकशी

Interrogation of Pooja sharma : आज सकाळी साडेदहाच्या सुमारास तिचे वकील तेजस राणे यांच्यासमवेत ती एसआयटीच्या कार्यालयात दाखल झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पूजा शर्मा ही आज सोमवारी २२ जुलैला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रायबंदर येथील क्राईम ब्रँचच्या ‘एसआयटी’समोर चौकशीसाठी आपल्या वकिलासोबत हजर झाली.

सुमारे दोन तासांच्या चौकशीवेळी तिची जबानी नोंदवून तिला पाठवण्यात आले. आता पुन्हा तिला उद्या सकाळी २३ रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्‍यामुळे पुढील काही दिवस तिला चौकशीसाठी येरझाऱ्या घालाव्‍या लागतील असे दिसते.

भारतीय पोलिस सेवेतील दक्षता अधिकाऱ्याची पत्नी असलेल्या पूजा शर्मा हिला उच्च न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन दिल्याने तिच्यावरील टांगती तलवार दूर झाली होती. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास तिचे वकील तेजस राणे यांच्यासमवेत ती एसआयटीच्या कार्यालयात दाखल झाली. तिने आपला चेहरा लपवण्यासाठी मास्क लावला होता व डोळ्यावर गॉगल होता. शिवाय ओढणीने अर्धवट चेहरा झाकून घेतला होता.

पूजाला तारणार ख्‍वाजा!

संशयित अर्शद ख्वाजा याने या प्रकरणाला तोच जबाबदार असल्याची कबुली एसआयटीसमोर दिली आहे. त्यामुळे पोलिसांकडे पूजाविरोधात या घटनेच्या कटकारस्थानात सहभागी असल्याचा ठोस पुरावा नाही.

दरम्‍यान, तिला बजावण्यात आलेल्या समन्सनुसार उपस्थित न राहण्याचे कारण पोलिसांनी चौकशीत विचारले असता, ती मूळ घरी नसल्याचे पूजाने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT