पिळगावमधील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय तूर्त मागे घेतल्याने अखेर डिचोलीतील ‘वेदांता’च्या खाणीवरुन खनिज वाहतूक एकदाची सुरु झाली आहे. सध्या 50 हून अधिक ट्रक खनिज वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरले असून, पुढील एक-दोन दिवसांत ट्रकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खनिज वाहतूक (Mineral Transport) सुरु झाल्याने बऱ्याच दिवसानंतर आता ट्रकांची धडधडही खाण परिसरात कानावर पडू लागली आहे. एनएसपी प्लांटवरुन पिळगावमार्गे सारमानस जेटीपर्यंत ही खनिज वाहतूक करण्यात येत आहे. वाहतुकीच्या मार्गावर शेतकऱ्यांनी निर्माण केलेले अडथळेही कंपनीने दूर केले आहेत.
डिचोली (Bicholim) खाण ब्लॉक-1 अंतर्गतची डिचोली येथील खाण ताब्यात ठेवण्यात आणि पर्यावरणीय दाखला मिळवण्यात कंपनी यशस्वी ठरल्यानंतर खनिज व्यवसाय सुरु करणारी ‘वेदांता’ ही राज्यातील पहिली खाण कंपनी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.