S. P. Tawade Dainik Gomantak
गोवा

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी एस. पी. तावडे

मागची दोन वर्षे अध्यक्षाविना चालत असलेला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी आता मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. पी. तावडे यांची नेमणूक केली

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: मागची दोन वर्षे अध्यक्षाविना चालत असलेला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी आता मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. पी. तावडे यांची नेमणूक केली असून सदस्य म्हणून वर्षा बाळे, नागेश कोलवाळकर व रचना गोंसालविस यांची नेमणूक केली आहे.

यापूर्वी या आयोगाचे अध्यक्ष असलेले निवृत्त न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे हे दोन वर्षांपूर्वी या आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर या आयोगाच्या सदस्य विद्या गुरव याही निवृत्त झाल्याने हा आयोग फक्त धनंजय जोग या एकाच सदस्यानिशी चालत होता. त्यामुळे आयोगासमोर दावे तुंबून पडले होते. या पार्श्वभूमीवर मडगाव येथील डॉ. डी. जे. डिसोझा यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून या रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी केली होती.

या याचिकेवरील सुनावणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असून त्यापूर्वीच सरकारने या नियुक्त्या केल्या आहेत.

दरम्यान दक्षिण गोवा जिल्हा आयोगाचे पद निवृत्त सत्र न्यायाधीश पी. व्ही. सावईकर हे निवृत्त झाल्याने रिक्त होते. त्यांच्या जागी आता या आयोगाचे अध्यक्ष म्हणून संजय चोडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT