Goa News 
गोवा

Goa News: मुक्तिदिन हीरक महोत्सव समारोपावर तब्बल 'इतके' कोटी खर्च; ‘आरटीआय’अंतर्गत माहिती उघड

आयरिश : ‘आरटीआय’अंतर्गत माहिती; कंत्राटदार कंपनी ‘विन्सन ग्राफिक्स’ला दिले 8.91 कोटी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News 2021 साली गोवा मुक्तिदिन हीरक महोत्सव समारोप समारंभ ताळगाव पठारावरील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला होता. त्‍यासाठी सरकारने सुमारे 9.25 कोटी रुपये खर्च केले.

या एकूण खर्चापैकी वास्कोस्थित इव्हेंट मॅनेजमेंट कंत्राटदार ‘विन्सन ग्राफिक्स’ला 8.91 कोटी रुपये देण्यात आले. ही बाब माहिती हक्क कायद्याखाली ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी मिळवलेल्या माहितीमध्ये उघड झाली आहे. सरकारकडून होणाऱ्या कोट्यवधींच्‍या अवाजवी खर्चाची दक्षता खात्याने चौकशी करण्याची गरज आहे, असे मतही त्‍यांनी व्यक्त केलेय.

समारोप समारंभासाठी एकूण 9 कोटी 25 लाख 23 हजार 341 रुपये खर्च झाला. त्यातील 8 कोटी 91 लाख 16 हजार 612 रुपये ‘विन्‍सन ग्राफिक्स’ला सरकारने दिले आहेत. याव्यतिरिक्त बसेसच्या भाड्यावर 28 लाख 46 हजार 391 रुपये खर्च केले.

त्यामध्ये 208 कदंब बसेस, 20 बालरथ व 163 खासगी बसेसचा समावेश आहे. स्टेडियमच्या भाड्यापोटी 5 लाख 60 हजार 500 रुपये गोवा क्रीडा प्राधिकरणाला दिले.

या सोहळ्यासाठी ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांसाठी 11 लाख रुपये, स्टेडियमच्या बाहेर बसण्याची व्यवस्था आणि एलईडी स्क्रीनसह शामियाना उभारण्यासाठी 25 हजार रुपये दिले गेले.

सरकारी प्रकल्पांच्या उद्‍घाटनासाठी 5 मिनिटे 10 सेकंदांची ऑडिओ व्हिज्युअल फिल्म बनवण्यासाठी 8 लाख 67 हजार 300 रुपये खर्च केले, तर त्‍या प्रवेशद्वारांवर दाखवण्‍यासाठी 34 लाख रुपये खर्च केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT