As many as 19,471 applications are pending for "Ladli Lakshmi" scheme in goa
As many as 19,471 applications are pending for "Ladli Lakshmi" scheme in goa Dainik Gomantak
गोवा

"लाडली लक्ष्मी" योजनेसाठी तब्बल 19,471 अर्ज प्रलंबित

दैनिक गोमन्तक

पणजी: लाडली लक्ष्मी योजनेला मंजुरी देण्यास झालेल्या विलंबामुळे नाराज झालेल्या एका जोडप्याने महिला आणि बाल विकास विभागाच्या कार्यालयात सांगितले की ते 2019 पासून योजनेची वाट पाहत आहेत. दैनिक हेराल्डने याबाबत वृत्त प्रसारीत केले आहे.

(As many as 19,471 applications are pending for "Ladli Lakshmi" scheme in goa)

2019 मध्ये या योजनेसाठी केला होता अर्ज

या जोडप्याने सांगितले की त्यांनी 2019 मध्ये या योजनेसाठी अर्ज केला होता. “कोविड-19 साथीच्या आजारामुळे योजनेला मंजुरी मिळण्यास झालेला विलंब आम्ही समजू शकतो. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाइन करण्यात आला होता परंतु आम्हाला ती स्वीकृत किंवा नाकारण्याबाबत कोणताही त्वरित संदेश मिळाला नाही. त्यामुळे आम्ही कार्यालयात पाठपुरावा करण्यासाठी आलो होतो,” असे या जोडप्याने कार्यालयात भेटल्यावर पत्रकारांना सांगितले.

दरम्यान जोडपे नाराज होते, ते म्हणाले, कार्यालयातील कर्मचारी त्यांना योजनेच्या मंजुरीबाबत योग्य माहिती देण्यात टाळाटाळ करत आहेत.

सार्वजनिक चौकशीसाठी असलेल्या संचालकांच्या केबिनबाहेरील कार्यालयातील लँडलाईन फोन सतत वाजत होता, परंतु डेस्कच्या मागे एक व्यक्ती उपस्थित असूनही कोणीही कॉल उचलण्याची तसदी घेत नसल्याचेही दिसून आले.

लाडली लक्ष्मी योजनेसाठी तब्बल 19,471 अर्ज प्रलंबित

महिला व बाल विभागाच्या संचालिका दीपाली नाईक यांनी लाडली लक्ष्मी आणि गृह आधार योजनांच्या प्रलंबित आणि प्राप्त अर्जांच्या स्थितीची माहिती देताना सांगितले की, “लाडली लक्ष्मी योजनेसाठी 19,471 अर्ज प्रलंबित आहेत. गृह आधार योजनेच्या बाबतीत, 12, 658 प्रलंबित आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

SCROLL FOR NEXT