कोलवाळ कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी

विदेशी कैद्यांना लक्ष्य: अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
Colvale Jail
Colvale JailDainik Gomantak

पणजी: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात अधुनमधून कैद्यांमधील हाणामारीची प्रकरणे ही सुरूच आहेत. या कारागृहातील रशियन कैद्याला स्वयंपाक विभागातील काही कैद्यांनी एकत्रित होऊन बेदम मारहाण केली. त्याच्या अगोदर त्यांनी एका नायजेरियन कैद्याला पैशांच्या व्यवहारावरून मारहाण केली होती. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची सुरक्षा हे चिंतेचा विषय बनला आहे. कैद्यांचे काही अधिकाऱ्यांशीही लागेबांधे असल्यामुळेच असे प्रकार घडूनही त्याकडे डोळेझाक केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कैदी चिन्नू गंगनावर, महम्मद सिद्धिक्की व बिपीन धनबाद हे तिघेही कारागृहातील स्वयंपाक विभागात कामाला आहे. कैदी चिन्नू याच्याकडे स्वंयपाक खोलीचा ताबा आहे. विशिष्ट प्रकारचे व चमचमीत जेवणासाठी कैद्यांकडून अधिक पैसे आकारले जातात. आलेक्सँड्रा कुरगनोव्ह या रशियन कैद्याने विशेष जेवण घेतल्याने त्याचे पैसे चिन्नूने मागितले होते. पैसे देत नसल्याने त्याने इतरांच्या मदतीने रशियन कैद्याला मारहाण केली. त्याला त्यानंतर म्हापसा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या घटनेची कोणतीच माहिती उघड केली गेली

Colvale Jail
Goa Panchayat Election: पंचायतींसाठी प्रभाग पुनर्रचना अधिसूचित

नाही. या कारागृहात आदल्या दिवशी या तिघा कैद्यांनी एका नायजेरियन नागरिकाला याच कारणावरून मारहाण केली होती. त्याच्याकडे विशेष जेवणाचे पैसे मागण्यात आले होते. कारागृहात सर्व कैद्यांना समान जेवण दिले जात तर स्वयंपाक खोलीतील त्या कैद्यांकडून अशा प्रकारचे जेवण देऊन पैसे उकळण्याचे प्रकार तेथील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच सुरू आहेत. कैदी चिन्नू याला अधिकारी जवळचे असल्याने त्याची कारागृहातच मक्तेदारी झाली आहे.

एका खून प्रकरणात कारागृहात असलेल्या एका कैद्याने थेट साक्षीदारालाच फोन करून न्यायालयात साक्ष न देण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाची माहिती साक्षीदाराने न्यायालयात दिल्यानंतर कारागृहाच्या सुव्यवस्थेबाबत संशयाचे वलय निर्माण झाले होते. कैद्यांना हे फोन पुरवितात व ते कारागृहात पोहचतात कसे हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. कारागृहातील सुरक्षा व्यवस्था अधिकाऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. साक्षीदाराला धमकावल्या प्रकरणाची तक्रार क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com