Delhi Chief Minister Shri Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

अरविंद केजरीवाल एकदिवसीय गोवा दौऱ्यावर

घरोघरी प्रचारासह आम आदमी पार्टीचा व्हिजन प्लॅन जाहीर करणार

दैनिक गोमन्तक

पणजी : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गोव्यात दाखल होणार आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा व्हिजन प्लॅन अरविंद केजरीवाल जाहीर करणार आहेत. त्यामुळे आप गोमंतकीयांसाठी काय आश्वासनं देणार याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जाहीरनामे, वचननामे प्रसिद्ध केले जात आहेत. आता आपकडून गोव्यासाठी पुढील पाच वर्षांचा व्हिजन प्लॅन मांडला जाणार आहे. आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल स्वत: गोव्यात येऊन हा व्हिजन प्लॅन मांडणार आहेत.

गोव्यासाठी याआधी तृणमूल काँग्रेस, रिव्हॉल्यूशनरी गोवन्ससह अनेकांनी आपला जाहीरनामा तयार केला आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांनी आपला अजेंडा जाहीर करायला सुरुवात केली आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. व्हिजन प्लॅन जाहीर केल्यानंतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सांत आंद्रे, कुठ्ठाळी, शिरोडा मतदारसंघात घरोघरी जात प्रचारही करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT