TMC: जॉन्सन फर्नांडिस100 हून अधिक समर्थकांसह ‘टीएमसी’त दाखल

सुष्मिता देव आणि टीएमसीचे (TMC) नेते तथा नगरसेवक महेश आमोणकर यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश
Johnson Fernandes with more than 100 supporters enters in TMC
Johnson Fernandes with more than 100 supporters enters in TMC Dainik Gomantak
Published on
Updated on

TMC: मडगावचे माजी नगराध्यक्ष जॉन्सन फर्नांडिस यांनी मडगाव येथे तृणमूल कॉंग्रेसच्या गोवा सहप्रभारी सुष्मिता देव आणि टीएमसीचे (TMC) नेते तथा नगरसेवक महेश आमोणकर यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. जॉन्सन व्यतिरिक्त महेश आमोणकर यांच्या 100 हून अधिक समर्थकांनाही पक्षात सामील करण्यात आले.

Johnson Fernandes with more than 100 supporters enters in TMC
रवी नाईक मडकईत की फोंड्यात?

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जॉन्सन म्हणाले, गोवा टीएमसीच्या महिला आणि युवकांसाठी योजलेल्या योजना मला आवडल्या. सरकार स्थापन झाल्यावर ‘टीएमसी’ ही सर्व आश्वासने पूर्ण करील.

सुष्मिता देव (Sushmita Dev) म्हणाल्या, महिलांना सक्षम बनवणाऱ्या ‘गृहलक्ष्मी कार्ड'' योजनेला गोव्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. गोव्यात अनेक युवक बेरोजगार आहेत. आमची युवा शक्ती योजना त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख रुपयांचे कर्ज देते. आमची तिसरी गृहनिर्माण योजना गोमंतकीयांना त्यांच्या घराचे स्वप्न आणि मालकी सुनिश्चित करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com