Goa E20 Petrol Dainik Gomantak
गोवा

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

E20 Petrol Impact Goa: ‘ई–२०’ पेट्रोलचा सर्वात जास्‍त परिणाम गोमंतकीय जनतेवर झाला आहे. त्‍यामुळे गोमंतकीय जनतेने संघटित होऊन भाजप सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन आम आदमी पक्षाचे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘ई–२०’ पेट्रोलचा सर्वात जास्‍त परिणाम गोमंतकीय जनतेवर झाला आहे. त्‍यामुळे गोमंतकीय जनतेने संघटित होऊन भाजप सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन आम आदमी पक्षाचे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले. ‘आप’तर्फे मंगळवारी पणजीत आयोजित टाऊनहॉल कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केजरीवाल म्हणाले, गोव्यात ८५ टक्क्यांहून अधिक कुटुंबांकडे दुचाकी, तर ४० टक्क्यांपेक्षा जास्‍त कुटुंबांकडे चारचाकी वाहने आहेत. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असल्याने सक्तीच्या ई–२० मिश्रणाचा गोमंतकीयांना मोठा फटका बसला आहे. राज्‍यातील विविध भागांतून आलेल्या वाहनमालकांनी ई–२० पेट्रोलमुळे भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा यावेळी मांडला.

अमेरिकेच्‍या दबावामुळे ऊस इथेनॉलसाठी

पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या दबावाखाली निर्णय घेत आहेत. अमेरिकेकडून इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारवर दबाव आहे. त्‍यामुळेच केंद्र सरकारने २५ लाख टन ऊस इथेनॉलसाठी वळवला. त्‍यामुळे साखरेच्‍या दरात वाढ होऊन त्‍याचा फटका सर्वसामान्‍य जनतेला बसत आहे, असे केजरीवाल म्हणाले.

टाऊनहॉलमध्‍ये सहभागींनी काय सांगितले?

ई–२० पेट्रोल वापरल्यानंतर त्याच्या दुचाकीचे मायलेज मोठ्या प्रमाणात कमी झाले असून वाहन अनेकदा मध्येच बंद पडते, असे एका दुचाकी चालकाने सांगितले. तर, ई–२० मुळे मायलेज कमी झाल्याने आपल्‍या कमाईचा मोठा हिस्सा इंधनावर खर्च होतो. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आपल्‍याला दररोज १५ ते १८ तास काम करावे लागत असल्‍याचे स्विगी डिलिव्हरी करणाऱ्याने स्‍पष्‍ट केले.

बाणावली येथील सुपरबाईक वर्कशॉप चालवणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअरने ‘‘ई–२० पेट्रोलच्या वापरानंतर थ्रॉटल बॉडीमध्ये अनेक समस्या दिसून येत आहेत. तसेच इथेनॉल आणि पेट्रोल वेगळे झाल्यामुळे पांढऱ्या पावडरीसारखा थर जमा होत असल्याचेही सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT