Maharashtra Artisans in Goa  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Ganesh Chaturthi: संसारासाठी नवऱ्यासोबत 'ती' करते वाद्यांची दुरुस्ती; गेल्या 21 वर्षांपासून डिचोलीत...

Maharashtra Artisans in Goa: आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर महिलाही पुढे येत आहेत. काही महिला तर आपल्या पतीसोबत काम करताना दिसून येतात. याचा प्रत्यय यंदाही डिचोलीत दिसून येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर महिलाही पुढे येत आहेत. काही महिला तर आपल्या पतीसोबत काम करताना दिसून येतात. याचा प्रत्यय यंदाही डिचोलीत दिसून येत आहे. पंढरपूरची एक महिला चक्क आपल्या नवऱ्याला चर्मवाद्ये वाद्ये दुरुस्ती करण्याच्या कामात मदत करीत आहे.

चतुर्थीचे वेध लागले, की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील तंतू आणि चर्मवाद्ये दुरुस्ती करणारे कारागीर गोव्याची वाट धरतात. पंढरपूर येथील एक कारागीर सुनील धुमाळ हे गेल्या जवळपास एकवीस वर्षांपासून चतुर्थीला महिना-दीड महिना असताना डिचोलीत येऊन चर्मवाद्ये दुरुस्ती करतात. सुनील धुमाळ हे कारागीर यंदाही डिचोलीत आले आहेत. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मंदाही आल्या आहेत. बाजारातील जागेत आपला व्यवसाय थाटून सध्या त्यांनी वाद्ये दुरुस्ती करण्यासही सुरवात केली आहे.

चतुर्थी म्हटली, की भजन, आरत्या आल्याच. त्यासाठी प्रामुख्याने तबला, पखवाज, समेळ आदी चर्मवाद्यांची आवश्यकता असते. चतुर्थीपुर्वी ही वाद्ये दुरुस्त करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरु असते. आणि मग ते वाद्ये दुरुस्त करणाऱ्या कारागिरांच्या शोधात असतात. सुनील धुमाळ हे कारागीर ही वाद्ये दुरुस्त करण्यात पटाईत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मंदा आली असून, ती आपले पती सुनील यांना या व्यवसायात मदत करीत असतात. सध्या सुनील धुमाळ यांच्याकडे दुरुस्तीसाठी वाद्ये आली असून, आपल्या पत्नीसमवेत ते दुरुस्तीकामात रमले आहेत.

वाद्ये दुरुस्ती करण्याचे मी प्रशिक्षण घेतलेले नाही. नवऱ्याबरोबर काम करताना अनुभवातून काही गोष्टी शिकून घेतल्या आहेत. पखवाज, डग्ग्याला शाई लावणे, वाद्या ओढणे आदी कामे मला जमतात. गेल्या अठरा वर्षांपासून मी नवऱ्यासोबत येत आहे. नवऱ्याला जमेल, ती सर्व मदत करते. मालकही आम्हीच आणि गडीही आम्हीच. विघ्नहर्त्या गणरायाच्या कृपेने गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.

- मंदा धुमाळ, कारागीर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT