New Parliament Building Murals: देशाची राजधानी दिल्लीमध्ये नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसदभवन इमारतीचे उद्घाटन झाले आहे. या नव्या संसद भवनाच्या उभारणीत देशभरातील कारागीरांचे हात लागले आहेत. या भवनाच्या सौंदर्यीकरणातही विविध कलावंतांची मदत घेतली गेली आहे.
नव्या संसद भवनातील म्युरल्ससाठी गोमंतकीय कलावंत सोनिया रॉड्रिग्ज-सबरवाल यांची निवड झाली होती. येथील म्युरल्सचे रंगकाम सोनियांनी केले आहे. या कामासाठी गोव्यातून निवड होणाऱ्या त्या एकमेव कलावंत होत्या.
देशभरातून 75 महिला आर्टिस्ट यात सहभागी झाल्या होत्या. सोनिया रॉड्रिग्ज-सबरवाल यांनी यात गोव्याते प्रतिनिधित्व केले.
दिल्लीच्या ललित कला अकादमीने या निवडी केल्या होत्या. सत्यभामा माझी आणि शरद कुमार यांनी याचे कोऑर्डिनेशन केले.
माझ्या गृहराज्याचे गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यास मिळणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, असे सोनिया यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. या प्रचंड म्युरलवर गोव्यातील सेव्हन सिस्टर गॉड्डेसपैकी एकीला स्थान मिळाले आहे. कावी डिझाईनमध्ये म्युरलवर ही कलाकृती साकारली गेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.