Lake Dainik Gomantak
गोवा

वनप्राण्‍यांसाठी जंगलात हवेत कृत्रिम तलाव!

तहान भागणार : खानापूरच्‍या धर्तीवर सत्तरीतही उपक्रम राबविण्याची नितांत गरज

दैनिक गोमन्तक

पद्माकर केळकर

वाळपई : पाण्याच्या आणि भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीत येणाऱ्या वन्यजीवांमुळे सत्तरी तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून उपद्रवी वन्यजीवांची समस्या जटील बनलेली आहे. शेती, बागायती करणे कठीणच होऊन बसले आहे. त्यावर वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम तलावाचा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

वन्यजीवांच्या उपद्रवाविरोधत शेतकरी आंदोलने करतात पण त्याचे फळ आजवर मिळालेले नाही. वन्यप्राणी भक्ष्‍याबरोबरच पाण्यासाठी लोकवस्तीत येतात. जंगलात पाणी मिळत नसल्‍याने प्राणी गावात येतात. परिणामी लोकांचा जीव धोक्‍यात येतो. त्यावर उपाय म्हणून आता तरी सरकारने वनविभागाच्या सहकार्याने सत्तरी तालुक्यातील जंगलात कृत्रिम तलाव उभारण्‍याची नितांत गरज आहे, जेणेकरुन पावसाचे पाणी या तलावात संवर्धित होऊन वनप्राण्‍यांना मिळेल.

कर्नाटकातील खानापूर तालुक्यात वन खात्याने 26 कृत्रिम पाण्याचे तलाव तयार केले आहेत. तीच कृती सत्तरीच्या जंगलात गोवा सरकारने राबविली तर दिलासादायक ठरेल. खानापूरचे पत्रकार राजू कुंभार यांनी दिलेल्या माहीतीनुसार, निसर्गसंपदेने नटलेल्या खानापूर वनक्षेत्रात आदर्शवत कृत्रिम तलाव निर्मितीचा उपक्रम तिथे राबविला आहे. लोकवस्तीत येणाऱ्या कित्येक प्राण्यांना रेल्वे व इतर वाहनांच्या धडकेत जीव गमवावा लागतोय. यावर शाश्वत उपाय म्हणून कृत्रिम तलाव उपयुक्त ठरत आहे.

भीमगड अभयारण्यातील तळेवाडीत जलस्रोत नसल्याने दीड किमीवरून वाहिनीद्वारे तलावात सोडले आहे. त्यामुळे लोकवस्‍तीत येणाऱ्या प्राण्यांची तसेच पक्ष्‍यांचीही जंगलातच पाण्याची सोय झाली आहे.

खानापुरात 26 तलावांची निर्मिती

खानापूर, लोंढा आणि भीमगड वन्यविभागाचे तत्कालीन रेंजर म्हणून जबाबदारी सांभाळलेल्‍या एस. एस. निंगाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2014 साली या उपक्रमास सुरुवात केली होती. त्यांनतर रोजगार हमी योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी झाली. नैसर्गिक जलस्त्रोताचा साठा करुन जंगलातील प्राण्यांसाठी आणि जंगलाला लागून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी ओलीताखाली आणण्याच्या दृष्‍टीकोनातून खानापूर विभागात आतापर्यंत 26 तलावांची निर्मिती करण्‍यात आली आहे.

सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या पायांचे ठसे तलावाच्या ठिकाणी आढळून येतात. वन कर्मचाऱ्यांकडून त्याचे परीक्षण केले जाते. ज्या ठिकाणी पाण्याचे मोठे स्रोत नाहीत, त्या ठिकाणी पाळीव जनावरांसह वन्यप्राण्यांची तहान भागविली आहे. पाण्याबरोबरच फळझाडांची लागवड करण्‍यात आली असून दुर्मीळ असे पक्षीही येथे येतात. पक्ष्‍यांसाठी विशेष प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.

- कविता इरनट्टी (क्षेत्रीय वनाधिकारी, खानापूर)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Supreme Court: स्वतःच्या इच्छेनं देहव्यापार करणं गुन्हा नाही! वेश्याव्यवसायावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काय नेमकं प्रकरण?

Goa land Zoning: 17 गावांतील सुमारे 2.01 कोटी चौरस मीटर जमीन 'NDZ'मध्‍ये; सूचना, हरकतींसाठी 30 दिवसांची मुदत; टीसीपीचा निर्णय

IPL 2026: कॅप्टन रजत पाटीदारचा मास्टरस्ट्रोक; आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकले आयपीएलचे जेतेपद!

Goa Comunidade land: जमीन घोटाळा प्रकरणी सावंत गावकर आक्रमक; सर्वण कोमुनिदादची जमीन, गावकऱ्यांनी अखेर उभारला फलक

Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT