Supreme Court Dainik Gomantak
गोवा

Supreme Court: ‘कलम 370’ हटविणे योग्य

Supreme Court: केंद्राच्या निर्णयावर ‘सर्वोच्च’ मोहोर : आता 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुका

दैनिक गोमन्तक

Supreme Court: जम्मू-काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आज वैध ठरविला. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याचे स्वतःचे असे अंतर्गत सार्वभौमत्व नसल्याची टिपणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली.

आता जम्मू - काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करावा आणि 30 सप्टेंबर 2024 पूर्वी याठिकाणी निवडणुका घेतल्या जाव्यात, असे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले.

केंद्र सरकारने 5 मार्च 2019 रोजी 370 वे कलम रद्द केले होते, त्यामुळे जम्मू-काश्मीरचा वेगळा राज्याचा दर्जा संपुष्टात आला होता तसेच जम्मू- काश्मीर आणि लडाख

अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली होती. केंद्राच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या २३ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या.

यावर चार वर्षांपेक्षा अधिक काळ सुनावणी घेतल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. एस. के. कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. बी. आर. गवई आणि न्या. सूर्यकांत यांच्या घटनापीठाने आज याबाबत निकाल दिला.

हेतू वाईट नव्हता

राष्ट्रपतींना ३७० वे कलम रद्द करण्याचा अधिकार असून घटनात्मकदृष्ट्या हा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा घटनापीठाने दिला आहे. राज्यघटनेतील सर्व तरतुदी जम्मू-काश्मीरला लागू होतात. हे कलम रद्द करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीरच्या भारतातील एकीकरणासाठी होता तसेच हे कलम रद्द करण्यामागे कोणतीही वाईट भावना नव्हती, अशी टिपणी न्यायालयाने केली . जम्मू-काश्मीरसाठी 370 वे कलम लागू करण्याचा पूर्वीचा निर्णय हा तात्पुरत्या स्वरूपाचा होता, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

पंडित नेहरूंमुळे जम्मू- काश्मीर भारतामध्ये समाविष्ट होण्यास विलंब झाला, त्यांनीच काश्मीरचा अर्धा भाग सोडून दिला होता. पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा त्यांनी संयुक्त राष्ट्रांत (यूएन) नेण्याची चूक केली. पाकव्याप्त काश्मीर कोणीही भारताकडून हिसकावून घेऊ शकत नाही. देशाची इंचभर देखील जमीन आम्ही गमावणार नाहीत. केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून दिसून आले आहे.
अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT