North Goa Police|Thief arrested  Dainik Gomantak
गोवा

Fraud Case : देशभरात तब्बल 100 कोटींची फसवणूक करणाऱ्या एरिक वाझला अटक; जुने गोवा पोलिसांची कारवाई

देशभरातील अनेकांची 100 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एरिक हेन्री वाझ (37) याला जुने गोवा पोलिसांनी सोमवारी अटक केली.

दैनिक गोमन्तक

Fraud Case : अनेक फसवणुकीच्या घटना दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी गोवा पोलीस प्रशासन नेहमीच सतर्क आहे. देशभरातील अनेकांची 100 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एरिक हेन्री वाझ (37) याला जुने गोवा पोलिसांनी सोमवारी अटक केली. याबद्दलची माहिती उत्तर गोव्याचे एसपी निधीन वलसान यांनी दिली.

वलसान यांनी सांगितले की, गोलाबारी पोलिस स्टेशन (कोलकाता) येथे नोंदवलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आणि बंगळुरू, मुंबई, पुणे, उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाझ याचा सहभाग असून त्याच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले होते.

गोलाबारी येथील सध्याच्या प्रकरणात, आरोपी हा गोल्ड हिल नावाच्या फर्मचा एकमेव मालक असून तो कोळसा आणि विदेशी चलन व्यापार करत होता. वाझ यांनी लोकांकडून खोट्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले. त्या पैशांचा त्याने गैरवापर केला. त्याने एकट्या हावडा, कोलकाता येथे 7 कोटींहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली असल्याचे वलसान यांनी सांगितले. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT