Goa AAP Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: प्रमोद सावंत यांच्यासह त्यांच्या पत्नीला अटक करा; काँग्रेसनंतर आता आपची मागणी

Goa AAP: ईडीची चौकशी ही निव्वळ भंडारी समाजाची सतावणूक करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप आपने केला.

Pramod Yadav

Goa CM Pramod Sawant

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कोरोना काळात राज्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एका मुलाखतीत केला होता. हा व्हिडिओ प्रसिद्ध करत मुख्यमंत्री सावंत यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने केली होती.

दरम्यान, आता दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी भंडारी समाजातील नेत्यांची ईडीकडून चौकशी झाल्यानंतर, आपने हाच भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री सावंत यांच्यासह त्यांच्या पत्नीला अटक करण्याची मागणी केलीय.

तसेच, ईडीची चौकशी ही निव्वळ भंडारी समाजाची सतावणूक करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप आपने केला.

गोव्यातील आप नेते राजेश कळंगुटकर आणि उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकार आणि मुख्यमंत्री सावंत यांच्यावर टीका केली.

'गोव्यात गुरुवारी (दि.28 मार्च) चार जणांची झालेली ईडीची चौकशी ही निव्वळ भंडारी समाजाची सतावणूक करण्याचे कारस्थान आहे. भंडारी समाज हा गरीब व कष्टाळू आहे कुणीही या समाजाला गृहित धरू नये नाहीतर हा समाज मोठ्या मोठ्या प्रस्थापितांना स्वाहा करेल असा,' इशारा आप नेते राजेश कळंगुटकर यांनी दिला.

'केवळ विधानाच्या आधारावर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते तर गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या विधानावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांना अटक करावी,' अशी मागणी आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली.

दिल्ली मद्य धोरण कथित घोटाळा आणि ईडीची चौकशी

दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. मद्य घोटाळ्यातील पैसा गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे.

याप्रकरणी गुरुवारी ईडीने आपचे गोवा संयोजक अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांची चौकशी केली. यानंतर राज्यातील भंडारी समाजाचे नेते आक्रमक झाले आहेत.

काँग्रेसने केली होती सावंत यांच्या अटकेची मागणी

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर काँग्रेसने माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या आरोपांचा संदर्भ देत मुख्यमंत्री सावंत यांच्या अटकेची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

पैसे परत न केल्यास FIR! वादग्रस्त 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमावर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

Goa Politics: काँग्रेस युतीस तयार; जागांबाबत विजय, मनोजशी लवकरच चर्चा; गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माहिती

T20 World Cup 2026 मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, कधी आणि कुठे होणार हाय-व्होल्टेज सामना? मोठी अपडेट आली समोर

Goa Live News:चावडी-काणकोणमध्ये ज्वेलरी दुकानात चोरीचा प्रयत्न; पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक!

SCROLL FOR NEXT