Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

Goa Nightclub Fire Update: मुख्य संशयित आरोपी क्लबचे मालक गौरव व सौरभ लुथरा यांना बुधवारी (१७ डिसेंबर) म्हापसा जेएमएफसी कोर्टासमोर हजर केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाइट क्लबमध्ये घडलेल्या अग्नितांडव प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी क्लबचे मालक गौरव व सौरभ लुथरा यांना बुधवारी (१७ डिसेंबर) म्हापसा जेएमएफसी कोर्टासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

यावेळी हणजूण पोलिसांनी न्यायालयासमोर संशयितांना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. दुसरीकडे, लुथरा बंधूंनी आरोग्याच्या कारणास्तव आपणास विशेष निवास व्यवस्था तसेच पाठदुखीमुळे झोपण्यासाठी गादीची व्यवस्था पुरवावी तसेच वैद्यकीय कारणास्तव कोठडी देऊ नये, अशी मागणी न्यायालयासमोर केली. परंतु, न्यायालयाने सर्व मागण्या फेटाळल्या.

मोठ्या गाजावाजासह अटक झालेल्या लुथरा बंधू आणि त्यांचा सहगुंतवणूकदार अजय गुप्ता यांनी कायदेशीर लढाईसाठी पूर्ण ताकदीने तयारी सुरू केली असून त्यांनी गोव्यातील नामवंत वकील रोहन देसाई यांची नियुक्ती केली आहे. आपल्या सुटकेसाठी कोणतीही कसर बाकी ठेवायची नाही, या इराद्याने त्यांनी थेट दिल्लीतून वकिलांची एक उच्चस्तरीय फौज गोव्यात बोलावली आहे.

अद्याप तिघांनीही जामिनासाठी अर्ज केला नसला तरी पुढील ८ दिवसांत हा अर्ज होण्याची शक्यता आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणानंतर लुथरा बंधूंना जामीन मिळणार की नाही, याकडे केवळ गोव्याचेच नव्हे, तर देशातील तपास यंत्रणांचे लक्ष लागून राहिले आहे.

खुले कोर्ट व माध्यमांचा कलगीतुरा...: दुपारी म्हापसा न्यायालयात लुथरा बंधूंना आणले गेले. परंतु, काही राष्ट्रीय मीडियांचे प्रतिनिधी कोर्टबाहेर गोंधळ व इलेक्ट्रॉनिक साहित्य घेत रिकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करू लागले होते. त्यामुळे सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना तोंडी कोर्ट रुममधून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे मीडियाकडून याचा विरोध झाला.

सुनावणी ही खुल्या कोर्टात सुरु होती. मात्र, सुनावणीवेळी कोर्टाचे दोन्ही दरवाजे आतून लावण्यात आले व बाहेर पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला. त्यामुळे कोर्ट रुममध्ये नक्की काय सुरु आहे, याची माहिती मिळत नसल्याने मिडिया प्रतिनिधी पोलिसांशी हुज्जत घालू लागले. मात्र, त्यानंतर सायंकाळच्या सत्रात प्रतिनिधींना कोर्ट रुममध्ये प्रवेश देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water supply: आठ दिवसांत सातवेळा फुटली जलवाहिनी, उगवेत तीव्र नाराजी; पाणीपुरवठ्याचा बोजवारा; जीर्ण जलवाहिनी बदलावी

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

Goa Accidents: दक्षिणेतील अपघाती मृत्यूत 84 टक्के घट; वाहतूक विभाग उपअधीक्षक प्रभुदेसाई यांची माहिती

SCROLL FOR NEXT