Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: सगळंच बेकायदेशीर! बर्च क्लबची जागा होती वस्तीसाठीचा 'सेटलमेंट झोन'; मिठागराचा भाग CRZ मध्ये, प्रशासनाला धक्का

Arpora Birch Night Club: गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण व उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांची मते याबाबत जुळत नसल्याने तो कळीचा मुद्दा ठरत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हडफडे येथे ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’ असलेले ठिकाण सर्वे क्रमांक १५८/० व १५९/० हे प्रादेशिक आराखडा २००१ मध्ये वस्तीसाठीचे ठिकाण (सेटलमेंट झोन) म्हणून नोंदले गेले होते, अशी धक्कादायक माहिती राज्य प्रशासनाला आढळली आहे. त्याठिकाणी मिठागर आहे आणि तो भाग सीआरझेडमध्ये येत असल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात आता म्हटले असल्याने या नोंदीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘बर्च’च्या ठिकाणी बेकायदेशीरपणा करण्यासाठी केव्हापासून तयारी सुरू होती, यावर यातून प्रकाश पडतो. हा भूभाग २००१ व २०११ च्याही प्रादेशिक आराखड्यात ‘वस्तीसाठीची जागा’ म्हणून नोंदवण्यात आला होता. मात्र, २०२१ च्या प्रादेशिक आराखड्यात ही चूक सुधारण्यात आली. केवळ बांधकाम असलेले ठिकाण वस्तीसाठीची जागा म्हणून नोंदवण्यात आले.

हा भाग सीआरझेडमध्ये येतो की नाही, यावरूनही वाद निर्माण झाला आहे. गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण व उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांची मते याबाबत जुळत नसल्याने तो कळीचा मुद्दा ठरत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात म्हटले आहे, की सुधारित नकाशामध्ये षटकोनी संरचना मिठागर/ पाणवठ्याच्या मध्यभागी असल्याचे स्पष्ट दिसते. अशा ठिकाणी कोणत्याही काळात, कोणत्याही कायद्यानुसार बांधकामास परवानगी नाही. मिठागर रूपांतर करणे, हे जमीन महसूल संहितेच्या कलम ३२ तसेच किनारपट्टी नियमन नियमांचे उल्लंघन आहे.

समितीने पाहिलेल्या कागदपत्रांवरून असेही स्पष्ट झाले की, या जमिनीचा वापर कृषीपासून अकृषी करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया कधीच राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे १९९८-९९ पासून झालेला संपूर्ण विकास हा कायद्याकडे दुर्लक्ष करून केल्याचे सिद्ध होते. म्हणून हडफडे गावातील सर्वे क्रमांक १५८/० व १५९/० वरील सर्व संरचना मूलतःच बेकायदेशीर आहेत.

‘यांच्या’वर प्रशासनाची करडी नजर

प्रादेशिक आराखडा २००१ हा १९८६ साली अधिसूचित करण्यात आला होता आणि त्याची कालमर्यादा सन २००१ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे त्या काळात या जमिनीत कोणाला रस होता, कोणाचा कब्जा होता आणि कोण त्यासंदर्भात व्यवहार करू पाहत होता, यावर आता प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.

अजयची रवानगी कोलवाळ तुरुंगात: उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यधिकाऱ्यांचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ‘बर्च’चा भागीदार असलेल्या अजय गुप्ताला अटक केली होती. अजयला आज म्हापसा जेएमएफसी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी कोलवाळ कारागृहात करण्यात आली.

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन क्लब’मधील अग्निकांडप्रकरणी अपात्र केलेले हडफडे-नागवाचे सरपंच रोशन रेडकर तसेच प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केलेले पंचायत सचिव रघुवीर बागकर यांचा शोध अद्याप हणजूण पोलिसांना लागलेला नाही. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यापासून दोघेही भूमिगत झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात रंगणार 9वा 'Aqua Goa Mega Fish Festival'; मच्छिमारांच्या प्रगतीसाठी 40% सबसिडीची घोषणा

अग्रलेख: गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनंतरही आपल्याला शेतं, डोंगर, पाण्याचे स्रोत, समुद्र किनारे यावर चर्चा करावी लागते, यासारखे दुर्दैव नाही

Harvalem: 'रवींच्या स्वप्नासाठी भंडारी समाजाने एकत्रित यावे'! ब्रह्मेशानंद स्वामींचे आवाहन; रुद्रेश्वर रथयात्रा वर्षपूर्ती सोहळा साजरा

ऑफिसमध्ये फक्त कामच! कामाच्या वेळी 'बर्थडे' आणि 'फेअरवेल' साजरे करण्यावर बंदी

Goa Live News: तुये हॉस्पिटल 100% 'जीएमसी'शी जोडले जाणार

SCROLL FOR NEXT