Arpora Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

जळीतकांडात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू! ‘बर्च’ प्रकरणाच्या निषेधासाठी दिल्लीत धरणे आंदोलन; जोशी कुटुंबीयांकडून मेणबत्ती फेरी

Arpora Nightclub Fire: ६ डिसेंबर २०२५ रोजी हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो क्लब’मधील अग्निकांडामध्ये दिल्लीतील जोशी कुटुंबामधील चौघांचा मृत्यू झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन क्लब’मधील अग्निकांडप्रकरणी उद्या (ता. ४) दिल्लीतील जंतर-मंतर येथे पीडित जोशी कुटुंबीयांकडून मेणबत्ती फेरी तसेच शांततापूर्ण धरणे आंदोलन केले जाणार आहे.

६ डिसेंबर २०२५ रोजी हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो क्लब’मधील अग्निकांडामध्ये दिल्लीतील जोशी कुटुंबामधील चौघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात जोशी कुटुंबीयांनी सर्व संशयितांविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहेत. म्हापसा येथील न्यायालयात जोशी कुटुंबीयांचे वकील विष्णू जोशी हे देखील उपस्थित होते.

ॲड. जोशी पत्रकारांना म्हणाले की, बनावट आरोग्य प्रमाणपत्र प्रकरणात अजय गुप्ताला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठोठावली आहे. मात्र, बनावट आरोग्य प्रमाणपत्र प्रकरणात लुथरा बंधूंना म्हापसा पोलिसांकडून अद्याप अटक होणे बाकी आहे. सर्वांनी जामिनासाठी अर्ज केला असून, जोशी कुटुंबीयांच्या वतीने आम्ही त्यांच्या जामिनाविरुद्ध हस्तक्षेप याचिका यापूर्वीच दाखल केली आहे.

गुप्ताचेही पोलिसांना असहकार्य

बनावट आरोग्य दाखलाप्रकरणी २३ डिसेंबर रोजी म्हापसा पोलिसांनी लुथरा बंधूंचा सहभागीदार अजय गुप्ता याला अटक केली होती. मागील दहा दिवसांपासून गुप्ता हा म्हापसा पोलिस स्थानकातील कोठडीत होता. या काळात संशयित गुप्ता तपासात असहकार्य करत होता. त्याच्या कंपनीने हे प्रमाणपत्र नक्की कुठून प्राप्त केले, याची माहिती संशयिताने पोलिसांनी पुरविली नाही. हे प्रमाणपत्र आमच्या फाईलमध्ये लावलेले होते, एवढेच उत्तर त्याने चौकशीवेळी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

लुथरा बंधूंच्या जामिनावर ७ रोजी सुनावणी

बनावट आरोग्य दाखलाप्रकरणी संशयित अजय गुप्ता याच्या जामीन अर्जावरील सुनावणी ६ जानेवारी होणार आहे. तर याच प्रकरणातील संशयित सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी ७ जानेवारी रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mobor Crime News: मोबोर समुद्रकिनाऱ्यावर थरार: पूर्ववैमनस्यातून छत्तीसगडमधील तरूणाची हत्त्या

Goa weather: मान्‍सूनपूर्व पावसात 40 टक्‍क्‍यांनी वाढ; सलग दोन दिवस हजेरी, जनजीवन विस्‍कळीत

Bangladesh Road Accident: ईदच्या आनंदावर काळाचा घाला! बांगलादेशात प्रवाशांनी भरलेला ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू; पहाटे घडला थरारक अपघात

Goa Milk Price Hike: गोवा डेअरीचे दूध 2 रुपयांनी महागले! सोमवारपासून नवीन दर लागू , जनतेला महागाईचा फटका

Budh Gochar 2026: नोकरीत बढती अन् व्यवसायात बक्कळ पैसा! बुध गोचर बदलणार तीन राशींचं भाग्य; घरात येणार अलोट संपत्ती

SCROLL FOR NEXT