Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Luthra Brothers: हडफडे अग्नितांडवप्रकरणी नवी माहिती! लुथरा बंधूंच्या जामिनावर मंगळवारी निकाल! सुनावणी ढकलली पुढे

Goa Nightclub Fire: अर्जावरील निकाल अद्याप तयार नसल्याने, न्यायाधीशांकडून ही सुनावणी मंगळवारी दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमधील अग्नितांडव प्रकरणातील, लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावरील निवाडा म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला आहे. अर्जावरील निकाल अद्याप तयार नसल्याने, न्यायाधीशांकडून ही सुनावणी मंगळवारी दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

सध्या संशयित गौरव व सौरभ हे लुथरा बंधू कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. गुरुवारी सायंकाळी सुनावणीवेळी लुथरांचे नातेवाईक, सरकारी वकील आणि संशयितांतर्फे बाजू मांडणाऱ्या वकिलांची टीम न्यायालयात हजर होती.

लुथरांचे वकील अ‍ॅड. पराग राव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, काही मीडिया रिपोर्टस्‌मध्ये दावा करण्यात आला आहे की, सरकारने बर्च दुर्घटनेतील पीडितांना नुकसान भरपाई देण्याची योजना आणली आहे. त्यानुसार, ही भरपाई संशयितांकडून वसूल केली जाईल. यासंदर्भात आम्ही न्यायालयाचे सगळे आदेश तपासून पाहिलेत.

मात्र अशाप्रकारचा एकही आदेश न्यायालयाने दिलेला नाही. किंबहुना आमच्या अशिलास तशी नोटीस मिळालेली नाही. माध्यमांमध्ये चुकीचे अहवाल देण्यात आले आहेत. दरम्यान, न्यायाधीशांनी या जामीन अर्जावरील निकाल अद्याप तयार नसल्याने ही सुनावणी येत्या १० फेब्रुवारीपर्यंत तहकूब करत असल्याचे सांगितले.

आता या अर्जावरील निकाल येत्या मंगळवारी दुपारी न्यायालय देणार आहे. दरम्यान, बर्च क्लबमधील आग दुघर्टनेप्रकरणी तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू असून, घटनेला जबाबदार असलेल्या बाबींचा सखोल तपास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अर्जात आरोपपत्राची माहिती लपवली!

वागातोर येथील रोमिओ लेन रेस्टॉरंटमध्ये २८ मे २०२२ रोजी, मेसर्स नोवेक्स कम्युनिकेशन पनालेम कंपनीची अधिकृत मान्यता न घेता बॉलिवूड गीत वाजवले गेले होते. याप्रकरणी कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी सूरज कुमार यांच्या तक्रारीच्या आधारे हणजूण पोलिसांनी रोमिओ लेन रेस्टॉरंटच्या बिंग लाईफ हॉस्पिलिटी प्रा. लि.चे संचालक अमित कुमार गुप्ता, राकेश कुमार गुप्ता, सौरभ लुथरा व गौरव लुथरा (सर्व रा. दिल्ली) यांच्याविरोधात कॉपी राईट कायदा कलम ६३ व ६९ कलमान्वये गुन्हा नोंद केला होता.

संशयित लुथरा बंधूंविरोधात ‘कॉपी राईट’चा स्वतंत्र गुन्हा नोंद असून याविषयी आरोपपत्र म्हापसा न्यायालयात पोलिसांनी सादर केले आहे. मात्र, आपल्या जामीन अर्ज पत्रात हा गुन्हा संशयित लुथरा बंधूंनी लपवण्याचा प्रयत्न केलाय, असे झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

या गुन्ह्याच्या कालावधीत सप्टेंबर २०२२ मध्ये, संशयित अमित कुमार गुप्ता याचे निधन झाले. त्यामुळे पोलिसांनी इतर संशयित संचालकांविरोधात जून २०२३ मध्ये म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. या खटल्याची पुढील सुनावणी जून २०२६ मध्ये होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs NZ: अहमदाबादमधील स्टेडियमवर भारतीय संघाचे काय होणार? अक्षर पटेल म्हणाला, 'मै हूं ना..'

Goa Economic Survey Report: गतवर्षी किती महसूलवाढ झाली? आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; केंद्रीय योजनांच्‍या लाभार्थींमध्‍ये वाढ

Illegal Beef Seized: भाजीच्या नावाखाली गोमांसाची बेकायदा वाहतूक! 750 किलो बीफ जप्त; बेळगावचा चालक ताब्यात

Goa Politics: खरी कुजबुज; ...तर बिबटे गावात येतील

Goa Budget Highlights: करवाढ नाही, डिजिटल टॅक्सी धोरण, नोकऱ्या; गोव्याचा अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे वाचा थोडक्यात..

SCROLL FOR NEXT