Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: 'क्लबमधील आगीच्या दुर्घटनेला कर्मचारी जबाबदार'! लुथरा बंधूंनी झटकले हात; पोलिस तपासात असहकार्य

Luthra Brothers: पोलिस सूत्रांनी सांगितले की, गुरुवारपासून (१७ डिसेंबर) लुथरा बंधूंची पोलिस अधिकाऱ्यांसमक्ष वन-टू-वन चौकशी सुरू आहे. मात्र, दोघेही या दुर्घटनेला स्वतःला दोष देत नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: हडफडे येथील बर्च क्लबमधील आगीच्या दुर्घटनेत, २५ निरपराधी लोकांचा जीव गेला. याप्रकरणी फरार लुथरा बंधू या क्लबच्या मालकांना गोवा पोलिसांनी ‘ब्ल्यू कॉर्नर’ नोटिशीद्वारे थायलंडहून पुन्हा भारतात आणले व नंतर आपल्याकडे अधिकृत ताबा मिळविला. ही गोवा पोलिसांसाठी मोठी उपलब्धी होती. बर्च दुर्घटनेत, सौरभ व गौरव हे लुथरा बंधू या गुन्ह्यातील संशयित आहेत. परंतु दोघेही सध्या पोलिस तपासात असहकार्य करीत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, गुरुवारपासून (१७ डिसेंबर) लुथरा बंधूंची पोलिस अधिकाऱ्यांसमक्ष वन-टू-वन चौकशी सुरू आहे. मात्र, दोघेही या दुर्घटनेला स्वतःला दोष देत नाहीत. आम्ही क्लबस्थळी कर्मचारी म्हणजे, काही व्यवस्थापकांची नियुक्ती केली होती.

त्यांना जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या. त्यामुळे मॅनेजमेंट मंडळी या आगीच्या दुर्घटनेला सर्वस्वी जबाबदार आहेत. तसेच क्लबमध्ये दुर्घटनेदिवशी ज्यांनी इलेक्ट्रॉनिक आतिषबाजी केली, ते इव्हेंटवाले जबाबदार आहेत. आमचा या दुर्घटनेशी थेट संबंध नसून सध्या दोघांनी जबाबदारीतून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या संशयित लुथरा बंधूंनी पोलिसांसमोर नकार घंटाची रणनिती अवलंबिल्याचे सूत्रांनी सांगितले.

अशावेळी पोलिसांसमोर लुथरा बंधूंकडून दडलेली खरी माहिती गोळा करण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच लुथरा बंधू इतके महिने कोणाच्या आशीर्वादाने बर्च क्लब, हा बेकायदेशीरपणे चालवत होते; आणि त्यांना नक्की कोणाचे अभय होते, या गोष्टी ऑन-रिकॉर्ड येतील का? असे प्रश्न लुथरा बंधूंनी घेतलेल्या आडमुठ्या धोरणांमुळे निर्माण झाले आहेत.

अजय गुप्ताला कोठडीत गादीची व्यवस्था...

लुथरा बंधूंचा सहभागीदार संशयित अजय गुप्ता हा हणजूण पोलिस कोठडीत आहे. संशयित गुप्ताने आपणास पाठदुखीचा त्रास असल्याचे सांगितले. त्यानुसार, न्यायालयाने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले असता, वैद्यकीय अहवालानुसार गुप्ताला कोठडीत गादी पुरविण्याची सूचना न्यायालयाने केली होती. या निर्देशानंतर, अजय गुप्ताला पोलिसांकडून कोठडीत गादीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT