Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

'बर्चला कोण जाऊन आले याचे पुरावे आपल्याकडे'! CM सावंतांनी उल्लेख केल्यामुळे अधिकारी धास्तावले; माहिती घेण्यासाठी धावपळ सुरु

CM Pramod Sawant: क्लबमध्ये गेलेल्यांनी तेथे आपत्कालीन दरवाजा नसल्याची बाब हेरली असती तर पुढील दुर्घटना टाळता आली असती, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अग्निकांडानंतर चर्चेत आलेल्या हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’मध्ये कोण कोण अधिकारी यापूर्वी जाऊन आले, याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत कशी पोचली, याचीच चर्चा सध्या प्रशासनात आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी याचा उल्लेख केला होता. या क्लबमध्ये गेलेल्यांनी तेथे आपत्कालीन दरवाजा नसल्याची बाब हेरली असती तर पुढील दुर्घटना टाळता आली असती, असे मुख्यमंत्री म्हणाले.

तेथे कोण कोण जाऊन आले, याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी बोलण्याच्या ओघात सांगून टाकले. त्यामुळे किनारी भागात पार्ट्या करणारे धास्तावले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे कोणाची छायाचित्रे व व्हिडिओ असतील, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न शुक्रवारी काहीजण करत होते. मुख्यमंत्री कार्यालयातून काही मिळते का यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी धास्तावलेले काहीजण पत्रकारांना विनंती करत होते.

अधिकाऱ्यांची उडाली झोप

एका परिषदेच्या निमित्ताने मुख्यमंत्री हे बोलले असले तरी त्याची धास्ती अनेकांनी घेतली आहे. कोणा कोणाविषयी पुरावे मुख्यमंत्र्यांकडे कोणी पोचवले असतील, याचाही अंदाज असे घाबरलेले अधिकारी लावू लागले आहेत. आणखी क्लबची अनियमितता पुढे आली, उच्च न्यायालयातील खटल्यातून आणखी काही माहिती समोर आली तर आपली पार्टी चर्चेत येईल का, अशी भीती त्यांना सतावू लागली आहे.

अनियमिततेवरही नजर हवी

मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनाच अशा विषयात लक्ष घालून प्रमाणित कार्यपद्धती ठरवावी लागते. अशी पद्धती असावी, असा विचार तेथे भेट दिलेल्या अधिकाऱ्यांच्या मनात का आला नाही, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे. क्लबमध्ये जाण्यात काही गैर नाही. मात्र, तेथील अनियमिततेवरही नजर हवी, असे त्यांनी सुचविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT