Health Camp
Health Camp Dainik Gomantak
गोवा

लग्नाला कुंडली बघतो तशी 'आरोग्य कुंडली' वर्षातून एकदातरी बघावी : मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

साखळी : आपण लग्नाला कुंडली बघतो, तशी आपल्या आरोग्याची कुंडली वर्षातून एकदा तरी बघावी, ज्यांना 40 वर्षे झाली असतील, त्यांनी आपली नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे व्यक्ते केले.

जेसीआय साखळीतर्फे भारतीय जनता पक्ष गोवा मेडिकल सेलच्या सहकार्याने रवींद्र भवन साखळी येथील आरोग्य शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी मधुमेह तज्ज्ञ डॉ.तेजस कामत, बीजेपी गोवा मेडिकल सेलच्या सहसंयोजक डॉ. स्नेहा भागवत, जेसीआय विभागीय अध्यक्ष ममता नाईक, जेसीआय साखळीचे अध्यक्ष चेतन सालेलकर, सचिव निकिता देसाई आदी उपस्थित होते.

या शिबिराला भारतीय जनता पक्षाच्या सुलक्षणा सावंत, भारतीय जनता पक्ष गोवा मेडिकल सेलचे संयोजक डॉ. शेखर साळकर, जेसीआय विभाग 11 चे अध्यक्ष ईशान उसपकर, माजी अध्यक्ष रिटा डिसा आदींनी मार्गदर्शन केले.

शिबिरात सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र साखळी, मणिपाल हॉस्पिटलचे जॉन सॅम्युअल, इझी व्हिजन आणि मुक्ता ऑप्टिशियन, मधुमेह चिकित्सा डॉ. तेजस कामत, दंत चिकित्सक डॉ. पूजा घाडी व डॉ. सत्यजित गावडे, आयुर्वेदिक वैद्य डॉ. ज्योती सावंत, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अक्षता मडकईकर यांनी सहकार्य केले. विविध तपासण्या यावेळी करण्यात आल्या. 250 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.

संपूर्ण शिबिर जेसीआयचे प्रकल्प अधिकारी रजत नाईक व संयोजक तेजस किणी यांनी नेतृत्व केले.

डॉक्टरांचा गौरव

साखळी परिसरातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यात डॉ. प्रदीप पडवळ, डॉ. विनायक कर्पे, डॉ. साईश मडकईकर, डॉ. ममता कर्पे, डॉ. दत्तराज बुडकुले, डॉ. नेहा बुडकुले, डॉ. अनु बुडकुले, डॉ. कल्पिता पोतदार, डॉ. शांभवी गाडगीळ, डॉ. रंजिता नाईक, डॉ. दत्ता देसाई, डॉ. अक्षता मडकईकर, डॉ. पूजा घाडी, डॉ. सत्यजित गावडे, डॉ. पवन कुमार, डॉ. शेर्लिन रॉड्रगीस यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT