Bhakti Kulkarni Dainik Gomantak
गोवा

Arjuna Award For Bhakti Kulkarni: गोव्याच्या बुद्धीबळपटू भक्ती कुलकर्णी यांना अर्जुन पुरस्कार जाहीर

पुरस्कार मिळविणाऱ्या तिसऱ्या गोमंतकीय खेळाडू; यापुर्वी दोन फुटबॉलपटुंचा सन्मान

गोमन्तक डिजिटल टीम

Arjuna Award For Bhakti Kulkarni: गोव्याची इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू, ऐतिहासिक बुद्धिबळ ऑलिंपियाड ब्राँझपदक विजेती भक्ती कुलकर्णी हिला प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

निवृत्त न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने 2022 सालच्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावांची शिफारस केली होती. त्यात महिला बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी, पुरुष बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद यांचाही समावेश होता. एकूण 25 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी, तर सर्वोच्च ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांची शिफारस करण्यात आली आहे.

पुरस्कार मिळवणारी तिसरी गोमंतकीय

मडगाव येथील 30 वर्षीय भक्ती ही ‘अर्जुन’ हा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील सन्मान प्राप्त करणारी अवघी तिसरीच गोमंतकीय ठरली आहे. यापूर्वी गोलरक्षक ब्रह्मानंद शंखवाळकर (1997) व आघाडीपटू ब्रुनो कुतिन्हो (2001) या गोमंतकीय फुटबॉलपटूंना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे.

भक्तीने बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. याशिवाय तामिळनाडुतील स्पर्धेत तिने हे जेतेपद स्वतःकडेच राखले होते. तसेच तिच्या इंटरनॅशनल मास्टर किताबावरही 2019 मध्येच शिक्कामोर्तब झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betalbatim Beach: आधी जीवरक्षकाशी वाद घातला, पण त्याच 'जीवरक्षका'ने वाचवला जीव; बेताळभाटी किनाऱ्यावर पर्यटकाची बेफिकिरी!

Viral Video: रील्ससाठी तरुणाईची अजब क्रेझ! म्हशीच्या पाठीवर उभ राहून पोरीचा डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवासाठी '14 ऑगस्ट' खास! आजच्याच दिवशी ठोकलं होतं पहिलं कसोटी शतक; 35 वर्षांनंतरही 'त्या' रेकॉर्डची आठवण कायम

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

SCROLL FOR NEXT