Vijai Sardesai And Giriraj Pai Vernekar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'अर्जेंटिनामध्ये जन्मलेल्या विजय सरदेसाईंना गोव्याची अ‍ॅलर्जी असल्याचं दिसतंय'; गिरिराज पै वेर्णेकर

Vijai Sardesai On Bhausabheb Bandodkar: खरी समस्या विजय सरदेसाई आणि त्यांच्या फुगलेल्या अहंकाराची आहे. इतरांपेक्षा तेच अधिक गोमंतकीय आहेत असं त्यांना वाटंत," असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Pramod Yadav

पणजी: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांना गोव्याच्या अस्मितेची अ‍ॅलर्जी होती. तशीच अ‍ॅलर्जी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना देखील आहे, असे वक्तव्य केल्याने फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सरदेसाई यांच्या वक्तव्याचा निषेध केल्यानंतर आता भाजप प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला आहे.

जनमत कौलाचा दिवस अस्मिता दिवस म्हणून साजरा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण न केल्याचे म्हणत सरदेसाई यांनी सावंतांवर टीका केली. यात त्यांनी पहिले मुख्यमंत्री बांदोडकरांवरही निशाणा साधला.

यावरुन भाजप प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी सरदेसाई यांना गोव्यातील उत्तुंग व्यक्तींचा अपमान करण्याची सवय लागलेली दिसते, असे म्हटले आहे.

2016 मध्ये मनोहर भाईंना 'दलाल' म्हटल्यानंतर आता त्यांनी (विजय सरदेसाई) गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावर टीका केली आहे. अर्जेंटिनाच्या ब्युनस आयर्स मध्ये जन्मलेल्या विजयला गोव्याचीच अ‍ॅलर्जी असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका वेर्णेकरांनी केली आहे.

यापूर्वी विजय सरदेसाई यांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री सावंत यांनी निषेध केला होता. "भाऊसाहेब हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी गोव्याची ओळख टीकवण्यासाठी प्रयत्न केला. खरी समस्या विजय सरदेसाई आणि त्यांच्या फुगलेल्या अहंकाराची आहे. इतरांपेक्षा तेच अधिक गोमंतकीय आहेत असं त्यांना वाटंत," असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार आणि वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. 'विजय सरदेसाईंचा उद्देश माझ्या लक्षात येत नाही. आपण पहिल्यांदा भारतीय आहोत आणि नंतर गोमंतकीय. त्याकाळी बांदोडकरांवर वरिष्ठ नेत्यांकडून खूप दबाव होता. त्यांना दोष न देता आपण पुढे जाऊयात. तसेच, कोणत्याही मुख्यमंत्र्यांची तुलना भाऊसाहेब बांदोडकरांसोबत होऊ नाही शकत', असे ढवळीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT