Vasco News Dainik Gomantak
गोवा

Vasco News: तुम्ही रेल्वेचे प्रतिनिधी, की सर्वसामान्य जनतेचे!

दुपदरीकरण नकोच : आरोशीगावकऱ्यांनी आमदार वाझ यांना सुनावले.

गोमन्तक डिजिटल टीम

तुम्हाला रेल्वेने निवडून आणले की आरोशी, वेळसांव, कासावली या गावांतील लोकांनी, ते आधी सांगा. अंडरपासच्या नावाखाली लोकांना ‘लॉलीपॉप’ देण्याचा प्रकार थांबवा. आम्हाला रेल्वे दुपदरीकरण नकोच, असे खडे बोल कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांना आरोशी येथील गावकऱ्यांनी सुनावले.

कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ आज आरोशी येथे रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यास गेले असता तेथे स्थानिक जमले. मात्र, अंडरपास आणि बॉक्स कल्व्हर्टच्या गरजेवरून आरोशी ग्रामस्थ दोन गटांत विभागले गेले. आरोशीतील वातावरण तंग झाले होते. स्थानिकांनी आमदार वाझ यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

रेल्वे दुपदरीकरणाच्या नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. वन अधिकारी ऑफिसमध्ये बसूनच परवानगी देतात. प्रत्यक्षात किती झाडांची कत्तल झाली याची पाहणी करत नाहीत. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी राजीनामा द्यावा. - ऑरव्हिल रॉड्रिग्स.

एका बाजूने वेळसांव किनाऱ्याची धूप होत आहे, तर दुसऱ्या बाजूने पाणथळ जागा बुजविल्या जात आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्याच्या वाटा बंद होऊ लागल्या आहेत. - ओलेंसियो सिमोईस, कॉंग्रेस नेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT