Archbishop Raul Nicolau Gonçalves Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे माजी आर्चबिशप राऊल गोंसाल्विस यांचे निधन

गोव्याच्या अस्मितेशी जुळणाऱ्या कित्येक आंदोलनात सक्रिय असल्यामुळे 'आंदोलक बिशप' अशी उपाधी

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोव्याचे माजी आर्चबिशप राऊल गोंसालविस (95) यांचे आज सकाळी निधन झाले. गोव्याच्या अस्मितेशी जुळणाऱ्या कित्येक आंदोलनात सक्रिय असल्यामुळे 'आंदोलक बिशप' अशी लोकांकडून उपाधी मिळाली होती. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पर्वरी येथील क्लर्जी होममध्ये वास्तवास असलेले फा. गोंसाल्विस यांची प्रकृती मागच्या दोन दिवसात गंभीररित्या खालावल्याने त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी संपूर्ण गोव्यातील चर्चमध्ये प्रार्थना सुरू केल्या होत्या. आज 1 जुलै रोजी सकाळी 8.30 च्या दरम्यान त्यांचे निधन झाले.

मूळ बांबोळी येथिल गोंसाल्विस हे गोव्याचे आर्चबिशप बनणारे पाहिले गोमंतकीय होते. त्यापूर्वी गोव्यातील सर्व आर्चबिशप हे पोर्तुगीज असायचे. 1978 साली त्यांची बिशपपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2003 साली त्यांना आर्चबिशपपदी बढती देण्यात आली होती.

गोव्यात झालेल्या विलीनीकरण विरोधी आंदोलनासह, राजभाषा आंदोलन ते कोंकण रेल्वे मार्ग विरोध आंदोलन यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते जरी या आंदोलनात स्वतः रस्त्यावर उतरले नसले तरी संपूर्ण चर्च संस्थेचा पाठिंबा त्यांच्यामुळे या आंदोलनाला मिळाला होता.

त्यांच्याच प्रयत्नामुळे गोव्याच्या चर्चची जी अधिकृत भाषा लॅटीन होती ती कोकणी झाली. त्यांच्यामुळेच पवित्र बायबल आणि इतर धार्मिक साहित्य कोकणी आणि अन्य देशी भाषांत रूपांतरित करण्यात आले. सर्व पाद्र्याना समान वेतन ही प्रथा गोव्यात त्यांनीच सुरू केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

रस्ता सुरक्षेपेक्षा दंडवसुलीला सरकारचे प्राधान्य; 22 ब्लॅकस्पॉटची दुरुस्त कधी? 1,520 मृत्यूंबाबत काँग्रेस सेवा दलाचे सवाल

SCROLL FOR NEXT