Aggregator Taxi App Protest Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: ‘माफिया’ म्हटलेले खपवून घेणार नाही! टॅक्सीचालकांचा इशारा, ॲग्रिगेटर ॲपला तीव्र विरोध

Aggregator Taxi App Goa: संदीप वायंगणकर म्हणाले, की गेली ३० वर्षे आम्ही टॅक्सी व्यवसायात असून ॲपआधारित टॅक्सी व्यवसायाबाबत सरकारने फेरविचार करून त्वरित ते रद्द करावे.

Sameer Panditrao

हरमल: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ॲग्रिगेटर ॲपचा निर्णय त्वरित बदलावा, तसेच वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी अनेकदा स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना ‘माफिया’ म्हटले असल्याने, त्यांचे विधान यापुढे खपवून घेणार नाही. प्रसंगी हक्कासाठी लढा उभारू, असा इशारा टॅक्सी व्यावसायिक संदीप वायंगणकर यांनी दिला.

हरमल येथे टॅक्सी व्यावसायिकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी हरमल, मांद्रे, मोरजी, केरी व पालये भागातील असंख्य टॅक्सी व्यावसायिक उपस्थित होते.

संदीप वायंगणकर म्हणाले, की गेली ३० वर्षे आम्ही टॅक्सी व्यवसायात असून ॲपआधारित टॅक्सी व्यवसायाबाबत सरकारने फेरविचार करून त्वरित ते रद्द करावे. सरकार कोणत्या आमिषापायी स्थानिकांचा व्यवसाय नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे, याचा अंदाज आमच्यासारख्या प्रामाणिक व्यावसायिकांना नाही.

अधिकाऱ्यांना निवेदन देणार

या बैठकीत विविध ठराव संमत करण्यात आले. प्रत्येक टॅक्सी व्यावसायिक लिखित स्वरूपात निषेधाचे निवेदन पेडणे वाहतूक कार्यालयात देणार असून, सरकारने याची नोंद घ्यावी. स्थानिकांच्या व्यवसायास आधार द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

बार्देश तालुक्यातही उमटले जोरदार पडसाद

राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांना सरकारने हरघडीस रस्त्यावर उतरवले असून सध्या ॲग्रिगेटेड ॲप सुरू करून प्रामाणिक टॅक्सी व्यावसायिकांना पुन्हा आंदोलनास भाग पाडले आहे. त्यामुळे सरकारने टॅक्सी व्यावसायिकांची सतावणूक न करता, ॲप त्वरित रद्द करण्याची मागणी टॅक्सी व्यावसायिक महादेव गावडे यांच्या शेकडो टॅक्सीचालकांनी केली आहे.

बार्देश तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिक या विषयावरून आक्रमक झाले आहेत. हरमल येथील मैदानावर आयोजित बैठकीस मांद्रे व किनारपट्टी भागातील शेकडो व्यावसायिक उपस्थित होते. या व्यवसायावरच आमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो, असे गावडे यावेळी म्हणाले.

पणजीत मोर्चा

टॅक्‍सीचालकांनी सोमवारी पणजीत मोर्चा काढण्‍याचे ठरवले आहे. त्‍या पार्श्वभूमीवर जिल्‍हाधिकाऱ्यांनी निषेध करण्‍यास प्रतिबंध करणारा आदेश जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT