Arambol Bhatwadi drone Dainik Gomantak
गोवा

Arambol: ..अचानक 'त्या' डोंगरावर फिरू लागले ड्रोन! हरमल ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; पोलिस स्थानकात तक्रार दाखल

Arambol Bhatwadi: शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास या भागात ड्रोन फिरू लागल्याने ग्रामस्थांनी डोंगरावर धाव घेतली आणि दोन युवकांना जाब विचारला.

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल: बहुचर्चित भटवाडी डोंगर भागात तसेच लोकवस्तीतही ड्रोन फिरू लागल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे रोहित साटेलकर यांनी सांगितले.

शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास या भागात ड्रोन फिरू लागल्याने ग्रामस्थांनी डोंगरावर धाव घेतली आणि दोन युवकांना जाब विचारला. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांनी हरकत घेतली आणि पोलिसांना पाचारण केले. ड्रोन उडविण्यासाठी परवान्याची गरज असून, तसा परवाना न घेतल्याची तक्रार युवकांनी केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही युवक व चारचाकी वाहन ताब्यात घेऊन त्यांना स्थानकात बोलावले. त्यावेळी संबंधित व्यवस्थापक उपस्थित होता. १० दिवसांपूर्वी या वाड्यावरील पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांनी या डोंगरासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत सचिवालयात तक्रार केली होती.

मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, पर्यावरणाचे रक्षण आवश्यक असून, संपूर्ण डोंगराचा झोन रद्द करू, असेही साटेलकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT