Luizinho Faleiro and Mamata Banerjee 
गोवा

गोव्याचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय राजकारणात, दिदींनी दिली मोठी जबाबदारी

तृणमूल कॉंग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी लुईझिन फालेरो यांची नियुक्ती

दैनिक गोमन्तक

तृणमूल काँग्रेसने आज शुक्रवारी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तृणमूल पक्षात सामील झाल्यानंतर काही दिवसातच फलेरो यांची नियुक्ती राष्ट्रीय उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे. टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी एका निवेदनाद्वारे ही घोषणा देत माध्यमांना माहिती दिली.

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी, 'लुईझिन फालेरो यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल अत्यंत अभिमान वाटतो,' असे म्हणत फालेरो यांचे स्वागत केले. "चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी लोकांच्या विकासासाठी खंबीरपणे काम केले आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली AITC उंची गाठेल आणि प्रत्येक भारतीय नागरिकांच्या लोकशाही हक्कांचे रक्षण करण्यासाठी लढा सुरू ठेवेल," असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

फालेरो यांनी अलीकडेच काँग्रेस पक्ष सोडला होता आणि 29 सप्टेंबर रोजी टीएमसीमध्ये सामील होण्यापूर्वी गोवा विधानसभेच्या सदस्यपदाचाही राजीनामा दिला होता. आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने गोव्याच्या निवडणूक राजकारणात उतरण्याची घोषणा केली आहे, गोव्यात 40 जागांसाठी 2022 फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत.

आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लुईझिन फालेरो यांनी अखेर कोलकातामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच लुईझिन फालेरो यांच्यासह अन्य 10 जणांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अनेक पक्षांचे प्रमुख नेते गोव्यातील जनतेला याजनांचे आश्वासन देतांना दिसत आहे. यातच सत्ताधारी भाजपबरोबर कॉंग्रेस, महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षांसह इतर पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत.

यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी पहिल्यांदाच 28 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर येणार आहेत. गोव्यात दाखल झाल्यानंतर त्या राज्यातील कार्यकर्त्यांसह जनतेशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT