लुईझिन फालेरो तृणमूलवासी

ममता बॅनर्जी यांच्याकडून माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरोंच स्वागत : मामलेदार यांच्यासह इतर आठजणांचा प्रवेश
Luizinho Faleiro & Chief Minister Mamata Banerjee
Luizinho Faleiro & Chief Minister Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांची गोव्यातील नेत्यांनी भेट घेतली. यात माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो (Luizinho Faleiro), माजी आमदार लवू मामलेदार, यतीश नाईक, विजय पै, मारिओ पिंटो,आनंद नाईक, रवींद्रनाथ फालेरो, शिवदास नाईक, राजेंद्र काकोडकर, अँटिनो मोंटेरिओ यांचा समावेश होता.

आपण ‘काँग्रेसमन’ असल्याचे सांगत अखेर गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो हे तृणमूलवासी झाले. कोलकाता येथे झालेल्या विशेष कार्यक्रमामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी, सरबजित मुखर्जी, सौगत रॉय यांच्या उपस्थितीत त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. फालेरो यांच्यासह गोव्याच्या आठजणांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला.

मगो पक्षाचे फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार, काँग्रेसचे सरचिटणीस यतीश नाईक, विजय पै, सचिव मारिओ पिंटो आणि आनंद नाईक, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्रनाथ फालेरो, कवी आणि लेखक एन.शिवदास, आर्थिक घडामोडींचे विश्लेषक राजेंद्र काकोडकर, ॲड. अंतोनिओ मोंतेरिओ यांचा समावेश होता. लवू मामलेदार आणि काकोडकर वगळता अन्य सर्वजण काँग्रेसचे संबंधित आहेत.

यावेळी फालेरो म्हणाले, ‘दीदी स्ट्रेट फायटर’ आहेत, उत्कृष्ट नेत्या आणि प्रशासक आहेत. त्यांच्या पराभवासाठी भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न केले, मात्र त्या जिंकल्या. त्यामुळे दीदीसोबतचा प्रवास हा विश्वासार्ह पर्याय आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सात वेळा आमदार राहिलेले आणि दिग्गज नेते फालेरो यांचे तृणमूल काँग्रेसच्या कुटुंबात स्वागत करताना मला अत्यंत अभिमान वाटतोय. गोव्यामध्ये नवीन सकाळ खुलवण्यासाठी आणि समाजात दुफळी निर्माण करणाऱ्या शक्तीविरुद्ध आपण एकजुटीने लढूया.

- ममता बॅनजी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com