CM Fellowship Program Dainik Gomantak
गोवा

CM Fellowship : ‘मुख्यमंत्री फेलोशिप' कार्यक्रमांतर्गत 10 उमेदवारांना नियुक्तीपत्रे; 40 हजारांचे मानधन

‘मुख्यमंत्री फेलो’ राज्यासाठी महत्त्वाचे : सावंत

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्याचे प्रशासन गतिमान होण्याबरोबर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक आवड निर्माण व्हावी यासाठी ‘मुख्यमंत्री फेलोशिप’ कार्यक्रम महत्त्वाचा आहे. यंदा यासाठी 20 उमेदवारांची निवड केली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या १० उमेदवारांना सोमवारी (ता.१२) मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे सादर करण्यात आली. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना उपस्थित होते.

या उमेदवारांमध्ये संचिता शांताराम नाईक, कनिशा कांता बेतोडकर, कालिंदी गुरुप्रसाद शेट्ये, श्रुती शानू देसाई, शायना रॉड्रिग्ज, नेहा गावकर, साईच्छा बोंबो देसाई, हर्षद अर्जुन निगुडकर, नितीन नवलू पाटील, सोनाली भानुदास गावकर यांचा समावेश होता.

"राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक वृत्ती वाढावी आणि अशा गुणात्मक विद्यार्थ्यांचा प्रशासनाला लाभ व्हावा यासाठी ही फेलोशिप योजना जाहीर केली आहे. गेल्यावेळी 10 आणि आता 20 उमेदवारांची यासाठी निवड केली आहे. या विद्यार्थ्यांना वर्षासाठी 40 हजार रुपये मानधन दिले जाते. संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करता येते आणि त्याचा प्रशासनालाही लाभ होतो."

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोंडा 'निर्नायकी' करण्याचा निर्णय - संपादकीय

Israel Air Strike: शस्त्रसंधीचा फज्जा! इस्रायलनं लेबनॉनवर डागली 100 हून अधिक क्षेपणास्त्रे, 250 जणांचा मृत्यू; इराणकडून 'होर्मुझ सामुद्रधुनी' पुन्हा बंद

डिचोली पालिका प्रभाग फेररचना अन्यायकारक असल्याचा दावा, सुनावणीवेळी नागरिकांनी नोंदवले आक्षेप; निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे मतदारांचे लक्ष

Omkar Elephant: 'ओंकार'चे घराच्या ओसरीपर्यंत आगमन, बंदोबस्त करा; कडशी–मोपा परिसरातील नागरिकांची मागणी

Mapusa: म्हापसा पालिकेचा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, थकबाकीच्या सक्तीविनाच होणार व्यापार परवान्यांचे नूतनीकरण

SCROLL FOR NEXT