candidature applications in canacona  Dainik gomantak
गोवा

काणकोण मतदार संघातील उमेदवारी अर्ज छाननीत सर्व उमेदवारांचे अर्ज ग्राह्य

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण मतदार संघातील सर्व आठही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननी नंतर ग्राह्य ठरविण्यात आले आहेत.त्याशिवाय तीन उमेदवार डमी आहेत. अशी माहिती काणकोण मतदार संघाचे निर्वाचन अधिकारी उदय प्रभू देसाई यांनी दिली. शुक्रवारी निवडणूक आयोगाचे Election Commission निरिक्षक चैत्रा एस.(आयपीएस) व मनिषा सेनिया यांनी मतदार संघाचा दौरा केला. (Applications of all candidates in scrutiny of candidature applications from canacona constituency accepted)

त्याचबरोबर निर्वाचन अधिकारी उदय प्रभू देसाई व अन्य कर्मचाऱ्यांबरोबर बैठक घेऊन मार्गदर्शन केले त्याचबरोबर निवडणूकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.

काणकोण Canacona मतदार संघात Constituency निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी तीन भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.राजेंद्र सावंत,हेमंत कुमार गावणेकर,कार्मो जे.एस.पाशेको हे या पथकाचे प्रमुख आहेत.त्याशिवाय आठ क्षेत्रिय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.कायदा व सुरक्षा राखण्यासाठी ठिक ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत असे निर्वाचन अधिकारी प्रभू देसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT