Anvesh Bandekar JEE Mains Goa | JEE Mains Result 2022  Dainik Gomantak
गोवा

JEE Main Result 2022 : ‘जेईई मेन’ मध्ये अन्वेश बांदेकर गोव्यात प्रथम

दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर : संस्कृती सक्सेना द्वितीय तर मुलींमधून पहिली

दैनिक गोमन्तक

JEE Main Result 2022 : देशातील विविध संस्थांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन परीक्षेच्या दुसऱ्या सत्राचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात डिचोली येथील अन्वेश बांदेकर (99.94 टक्के) राज्यात प्रथम तर संस्कृती सक्सेना (99.36 टक्के) द्वितीय तर मुलींमध्ये पहिली आली. महाराष्ट्रातील श्रेणीक साकला याने 100 गुण प्राप्त करत देशात पहिला क्रमांक पटकाविला.

या परीक्षेत देशातील 24 विद्यार्थ्यांनी 100 एनटीए स्कोअर मिळविला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) ही परीक्षा घेण्यात आली असून, निकाल ‘एनटीए’च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. देशात ही परीक्षा मराठीसह आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम्‌, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू, ओडिया अशा 13 भाषांमध्ये घेण्यात आली.

तर देशातील 440 शहरांमधील 622 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा 25 ते 30 जुलैदरम्यान घेण्यात आली. देशाबाहेरील 17 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. बी. आर्किटेक्चर आणि बी. प्लॅनिंगचे दुसऱ्या सत्रातील निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे.

गोव्यातून 201 विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी जेईई ॲडव्हान्स परीक्षा देण्यास पात्र ठरले आहेत. बांदेकर व सक्सेना हे दोघेही कुजिरा येथील मुष्टीफंड आर्यन हायर सेकंडरी स्कूलचे विद्यार्थी आहेत. या स्कूलमधील 15 विद्यार्थ्यांनी ‘जेईई मेन’मध्ये 99 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. ‘जेईई मेन’ दोन परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेतील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक गुण विचारात घेऊन निकाल तयार करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT