Antonio Costa New European Council President Dainik Gomantak
गोवा

Antonio Costa: मूळचे गोव्याचे असणाऱ्या अँटोनियो कोस्टा यांची युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड; PM मोदींनी केले अभिनंदन!

Antonio Costa New European Council President: पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांची युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Manish Jadhav

पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांची युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. भारत-EU धोरणात्मक भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी मी त्यांच्यासोबत (कोस्टा) काम करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. मूळचे गोव्याचे (Goa) असलेले कोस्टा यांची नुकतीच युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील पोस्टमध्ये म्हटले की, 'युरोपियन कौन्सिलच्या पुढील अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझे मित्र अँटोनियो कोस्टा यांचे अभिनंदन. भारत-EU धोरणात्मक भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.' कोस्टा 2015 ते 2023 पर्यंत पोर्तुगालचे पंतप्रधान होते. नोव्हेंबर 2023 मध्ये कोस्टा यांनी एका भ्रष्टाचार (Corruption) प्रकरणाशी संबंधित तपासामुळे पदाचा राजीनामा दिला होता.

युरोपियन कौन्सिलची कमान कोणाकडे सोपवायची या संदर्भात अलीकडेच ब्रुसेल्समध्ये युरोपियन युनियनच्या नेत्यांची बैठक झाली. अध्यक्षपदाचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. तथापि, इटली आणि हंगेरीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे या निर्णयावर वाद निर्माण झाले. पण इटलीच्या पीएम जॉर्जिया मेलोनी आणि हंगेरीचे व्हिक्टर ऑर्बन यांच्या विरोधाला न जुमानता उर्सुला वॉन डेर, अँटोनियो कोस्टा आणि काजा कलास यांना EU मधील महत्त्वाच्या पदांसाठी नॉमिनेट करण्यात आले.

उर्सुला वॉन डेर यांची दुसऱ्यांदा युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. तर अँटोनियो कोस्टा युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष झाले. तर काजा कलस यांची परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाचे उच्च प्रतिनिधी म्हणून निवड झाली. उर्सुला वॉन डेर आणि कलास यांच्या नियुक्त्यांना युरोपियन संसदेची मंजुरी मिळणे बाकी आहे. कोस्टा 1 डिसेंबरपासून पदभार स्वीकारतील. राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इटलीच्या पीएम मेलोनी यांनी कोस्टा आणि कलास यांच्या दाव्यांना विरोध केला होता.

नवीन भूमिका स्वीकारताना कोस्टा म्हणाले की, 'युरोपियन कौन्सिलच्या नव्या अध्यक्षाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब आहे. मी समाजवादी समर्थकांचे आणि पोर्तुगीज सरकारचे आभार मानतो, ज्यांनी ऐक्य राखले.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT