काणकोण: पोळे (Pole) तपासणी नाक्यावर कालपासून कर्नाटकातून (Karnataka) गोवा (Goa) राज्यात प्रवेश करणाऱ्याची 12 लोकांची एन्टिजन टेस्ट (Antigen test) करण्यात आली आहे. आज दुपार पर्यत सर्वाच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या असल्याचे तपासणी नाक्यावर असलेल्या काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. एन्टिजन तपासणी साठी प्रत्येक व्यक्तीमागे 270 रुपये शुल्क आकारणी करण्यात येते आहे. बिगर सरकारी दोन करोना तपासणी अस्थापने उघडण्यासाठी तयारी सुरू करण्यात येत आहे.(Antigen tests have been conducted on 12 people coming to Goa from Karnataka)
दरम्यान राज्य 'कोविड' मुक्त करण्याच्या मोहिमेंतर्गत फिरत्या पथकाव्दारे दोडामार्ग तपासणी नाक्यावर सकाळपासूनच 'कोविड'ची रॅपिड अँटीजेन चाचणी मोहीम राबवण्यात येत आहे. या विशेष मोहिमेव्दारा राज्याबाहेरून गोव्यात येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. आरोग्य खाते आणि डिचोली मामलेदार कार्यालयाच्या सहकार्याने उत्तर गोवा जिल्हा प्रशासनातर्फे ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आतापर्यंत डिचोलीत 126 जणांची चाचणी करण्यात आली आहे या फिरत्या पथकाव्दारे डिचोली बाजारात चाचणी मोहीम राबविण्यात आली आहे. या रॅपिड अँटीजेन चाचणी मोहिमेंतर्गत डिचोली बाजार परीसरातील व्यापारी, विक्रेते, ग्राहक आदी मिळून 126 जणांची 'कोविड'' चाचणी करण्यात आली आहे. त्यात सगळ्या नागरिकांचा अहवाल नकारात्मक निघाला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.