Fire In Goa  Gomantak Digital Team
गोवा

Goa Fire News : खोतिगाव, गावडोंगरी येथे जंगलाला पुन्हा आग

वन खात्यासह अग्निशामक दल सक्रिय

दैनिक गोमन्तक डिजिटल

गावडोंगरी, खोतिगावातील डोंगर माथ्यावर गेल्या आठवड्यापासून आग लागण्याच्या घटना घडत आहेत. सध्या आग डोंगरमाथ्यावर धुमसत आहे. वन खात्याचे कर्मचारी अग्निशामक दलाच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

गावडोंगरीतील सातोर्ली डोंगरमाथ्यावर गेल्या आठवड्यापासून आग धुमसत आहे. तर खोतिगावातील येडा, पणसुलेमळ, बड्डे येथेही जंगलाला आग लागली आहे. यात हजारो चौरस मीटर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.

मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे खोतिगाव अभयारण्याचे क्षेत्रिय वन अधिकारी अनंत वेळीप यांनी सांगितले.

जळीतग्रस्त भागात वृक्षलागवड

गेल्या महिन्यात राज्यात ठिकठिकाणी जंगल, माळरान, बागायतींना आग लागण्याचे प्रकार घडले होते. या दुर्घटनेची दखल गांभीर्याने घेतली असल्याची माहिती वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

ज्येष्ठ वन्यजीव तज्ज्ञ आणि कर्नाटकचे माजी प्रधान वनसंरक्षक लुथ्रा, ‘जीसीझेडएमए’चे तज्ज्ञ सदस्य सुजीत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ड्रोन आणि अत्याधुनिक तंत्राचा वापर करून जंगलांमध्ये काही दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी वणवे लागले होते, त्या भागांमध्ये जळलेल्या झाडांचा अभ्यास करून नव्याने त्या ठिकाणी झाडे लावण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे वनसंरक्षण ही वचनबद्धता आहे, अशी ग्वाही विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT