Goa High School: कुजिरा येथील मुष्टिफंडचे स्नेहसंमेलन संस्थेच्या सभागृहात शुक्रवारी उत्साहात पार पडले. यावेळी ‘ईडीसी’चे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अनिल खंवटे, सचिव सुहास सरदेसाई, कोषाध्यक्ष दिलीप धारवाडकर, संयुक्त सचिव जयराम खोलकर, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष गीतालक्ष्मी, प्रा.नवनाथ परुळेकर, वरिष्ठ शिक्षिका सुचेता नाईक, विद्यार्थी मंडळ प्रमुख अलंकृती नाईक उपस्थित होत्या.
समई प्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. अनिल खंवटे यांनी प्रास्ताविक केले. कोविडमुळे खंड पडलेल्या वर्षातील पारितोषिके यावेळी विशेष श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात आली. 2021 मधील दिलीप कैसरे व स्व. उमाबाई कैसरे स्मृती अष्टपैलू विद्यार्थी पुरस्कार साईराज जयंत नाईक याला तर माधव भिडे स्मरणार्थ संजय कैसरे व सुहास सरदेसाई पुरस्कृत अष्टपैलू विद्यार्थिनी पुरस्कार दीक्षा देवेंद्र नाईक हिला प्रदान करण्यात आला.
सदानंद तानावडे यांनी सांगितले की,मुष्टिफंड ही जुनी लौकिकप्राप्त संस्था आहे. संस्थेसाठी समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमुळे ती विश्वासार्हता टिकून आहे. कुजीरा शैक्षणिक संकुलाच्या विकासाठी निश्चितच मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
सूत्रसंचालन सोनाली नार्वेकर,सचिन सबनीस, सारिका सरदेसाई, शारदा परब यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे दिनार भाटकर, डॉ. राजन कुंकळकर, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अपर्णा च्यारी, शिक्षिका बिना शंखवाळकर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुषमा धारवाडकर उपस्थित होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.