Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

डॉ.प्रमोद सावंत यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून घोषणा

राज्यपालांनी केली विधानसभा विसर्जित

दैनिक गोमन्तक

पणजी: सातव्या विधानसभेचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच विधानसभा विसर्जित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांना सादर करण्यात आला. राज्यपालांनी राजीनामा त्वरित मंजूर केला आणि नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. तर संध्याकाळी विधानसभा बरकास्त केल्याची घोषणा राज्यपालांनी केली आहे.

तसे पत्र राज्यपाल पिल्लई यांनी डॉ. प्रमोद सावंत यांना दिले आहे. नव्या सरकारबाबत भाजपच्या केंद्रीय संसदीय समिती लवकरच निर्णय घेणार असून येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय संसदीय समितीचे विशेष निरीक्षक लवकरच गोव्यात येतील आणि ते विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊन नव्या विधिमंडळ नेते पदाची निवड करतील.

त्यानंतर नवा नेता राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करेल. अधिकृत माहितीनुसार प्रमोद सावंत हेच नव्या विधिमंडळ पक्षाचे नेते असतील. ते या नेता निवडीच्या प्रक्रियेनंतर सरकार स्थापनेचा दावा करतील. यासंदर्भात सावंत म्हणाले, लवकरच नवे सरकार अस्तित्वात येईल. मात्र, यासंदर्भातील सोपस्कार केंद्रीय संसदीय कमिटी पूर्ण करेल. अद्यापही केंद्रीय निरीक्षक कोण येणार? याची माहिती मिळालेली नाही. मात्र, यासंदर्भातला निर्णय पक्षाची केंद्रीय समिती आमच्याकडे पाठवेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे 16 मार्चपूर्वी नवे सरकार राज्यात अस्तित्वात येईल.

गटनेत्याचा शपथविधी

सातव्या विधानसभेचा कार्यकाळ 16 मार्चला संपत आहे. तत्पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. अपक्ष आणि मगो पक्षाच्या आमदारांच्या सहकार्याने भाजप सरकार बनवणार हे स्पष्ट आहे. यासाठी विधिमंडळ नेता निवडीची आवश्यकता असून ही निवड सोमवारी होण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवारी 15 मार्च रोजी नव्या गटनेत्याचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

नवे सरकार बनविण्यासाठीचे सोपस्कार आम्ही पूर्ण करत आहोत. नवे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मला राज्यपालांनी विनंती पत्र दिले आहे. त्यानुसार नवीन सरकार येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मी काम करेन.

- डॉ. प्रमोद सावंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT