गोवा पोलिसांचा अमली पदार्थ विरोधातील कारवाईचा धडाका सुरूच आहे, दिनांक 18 ऑक्टोबर रोजी गोव्यात येणाऱ्या अमली पदार्थ विरोधात मोठ्या कारवाया झाल्या असताना आज गोव्यातील हणजूण येथे तब्बल 18 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केले आहेत.
( Anjuna police seized ganja worth 18 lakhs from Devidas Naik and Jyoti Naik )
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला हणजूण येथे काही व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी कारवाई करत कोकेन,एलएसडी आणि चरस हे अमली पदार्थ बाळगणाऱ्या देवीदास नाईक आणि ज्योती नाईक या भावंडांना अटक केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल 18 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले असून संशयित आरोपींचा यापुर्वी काही गुन्ह्यात समावेश घेतला आहे का? याचा तपास सुरू आहे अशी माहिती हणजूण पोलिसांनी दिली आहे. या कारवाईतील आरोपींची नावे अथवा अधिकची माहीती समजु शकलेली नाही. तसेच आरोपी नेमके कोणत्या उद्देशाने अमली पदार्थ घेऊन आले होते. याबाबत ही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.