Goa Hotel Guidelines Dainik Gomantak
गोवा

Goa Hotel Guidelines: मद्यपान केलेल्या ‘गेस्ट’ना नीट हाताळा! पर्यटकांना मारहाणीचा मुद्दा; पोलिसांचे ‘20 कलमी नियम’ जारी

Anjuna Hotel Police Meeting: यूपीच्या पर्यटक कुटुंबाला मारहाणीच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी म्हापसा पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांनी हणजूणातील हॉटेल्स व्यावसायिकांसोबत महत्वाची बैठक घेतली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: वागातोर, येथे रोमियो लेन परिसरातील क्लबचे स्टाफ, बाउन्सरकडून यूपीच्या पर्यटक कुटुंबाला मारहाणीच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी म्हापसा पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांनी हणजूणातील हॉटेल्स व्यावसायिकांसोबत महत्वाची बैठक घेतली.

संबंधितांसाठी पोलिसांकडून २० कलमी-सूचना नियमावली जारी केली असून, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा केली. हॉटेल्स, नाईट्स क्लब व रेस्टॉरंट आस्थापनाचे मिळून सुमारे ७० मालक, प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावली. यावेळी निरीक्षक सुरज गावस हे देखील हजर होते.

पोलिसांनी नियमावलीत म्हटले आहे, की आस्थापनस्थळी किमान एक महिन्यांची रेकॉर्डिंग क्षमता व रात्रीच्या दृश्यमानतेसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. परिसरात व आजूबाजूला योग्य रोषणाई ठेवावी. हॉटेल्स व्यावसायिकांनी त्यांच्या परवान्यात निर्दिष्ट केलेल्या वेळा व अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश पोलिसांनी दिलेत.

तसेच संगीत आवाजाची पातळी विहित मर्यादेत राहील, याची खात्री करावी. आस्थापनस्थळी प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी नेमणे. अनधिकृत व्यक्ती किंवा संशयास्पद हालचालींची पोलिसांना माहिती द्यावी. स्वयंपाकघर, बार, स्वच्छतागृहे व अतिथी खोल्यांमध्ये स्वच्छतेचे मानक राखणे. तसेच ग्राहक सेवा, सुरक्षितता व आपत्कालीन प्रतिसाद या विषयात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे.

कोणीही मद्यधुंद व्यक्ती गोंधळ घालून इतरांना त्रास देत असल्यास पोलिसांशी (११२) थेट संपर्क साधावा. आणि कोणत्याही स्थितीत कायदा आपल्या हातात घेऊ नये, अशी ताकीद आस्थापनातील कर्मचाऱ्यांना द्यावी, अशी कडक नियमावली असलेले निर्देश पोलिसांनी हॉटेल आस्थापनांच्या मालकांना दिले.

‘गेस्ट’ना नीट हाताळा!

पोलिसांनी हॉटेल व्यावसायिकांना सांगितले की, मद्यपान केलेल्या ‘गेस्ट’ना नीट वसायिकरित्या हाताळावे. कर्मचारी किंवा बाउन्सर यांनी कोणत्याही स्थितीत गेस्टसोबत शारीरिक बळाचा वापर करू नये. आस्थापनस्थळी गोंधळ किंवा भांडण झाल्यास, कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा.

आस्थापनात कर्मचारी नियुक्ती करतेवेळी, त्यांची पार्श्वभूमीवर व अनिवार्य असलेली पोलिस पडताळणी करावी. दर आठवड्याला कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या जबाबदारीबाबत माहिती द्यावी. तसेच पडताळणी केलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती स्थानिक पोलिसांत सादर करावी, असे या नियमावलीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Theft Case: नामवंत ज्वेलरी शोरुममधून लंपास केलं 2.5 कोटींचं सोनं, चोरीच्या पैशांतून घेतली कोट्यवधींची मालमत्ता, लखनौच्या 'कोमल'चा पर्दाफाश!

प्रतीक्षा संपली! रोनाल्डो FC गोवाशी भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

Virat Kohli Net Worth: लक्झरी लाईफस्टाईल, ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधींची कमाई, आलिशान कारचं कलेक्शन; किंग कोहलीची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क!

डिजिटल क्षेत्रात 'WISE' ची क्रांती! बातमी निर्मिती आता होणार 'सुपरफास्ट'; Oneindia ने विकसित केला नवा AI प्लॅटफॉर्म

पाकिस्तान जिंदाबाद फलक प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सक्त करावाईचे आदेश, अवैध मद्य तस्करीबाबतही इशारा

SCROLL FOR NEXT