Arrest Dainik gomantak
गोवा

Goa Night Club: पर्यटकांवर हल्ला प्रकरणी दोन संशयित बाऊन्सरना अटक; आसगावातील क्लबमधील घटना

पुणे येथील चार जणांचा गट पर्यटनासाठी गोव्यात आला होता

Rajat Sawant

Night Club Bouncers Attack On Tourist At Goa: आसगावातील एका क्लबमध्ये तेथील बाऊन्सरनी पर्यटकावर खूनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्या संशयित दोन बाऊन्सरना पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे येथील चार जणांचा गट पर्यटनासाठी गोव्यात आला होता. यावेळी ते क्लबमध्ये गेले असता त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. हणजूण पोलिसांनी संशयितांना अटक केली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन युवक व एक युवती असा चार जणांंचा गट पुणे येथून गोव्यात पर्यटनासाठी आला होता. हा गट शनिवारी आसगाव येथील एका क्लबमध्ये गेला होता. याच गटातील नितेश हे पहाटे क्लबमधील वॉशरूममध्ये जाण्यास निघाले.

यावेळी त्यांना क्लबमधील बाऊन्सरनी जाण्यास अटकाव केला. यावरुन त्यांच्यात वाद झाला. यावेळी नितेश यांच्या मदतीसाठी त्यांचे अन्य मित्र आले. यावेळी संशयितांनी या पर्यटकांसोबत हाणामारी केली.

यावेळी संशयिताने नितेशवर दारूची बाटली डोक्यात हाणली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचे मित्र मैत्रिणही किरकोळ जखमी झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

किरकोळ जखमींना लगेच डिस्चार्ज देण्यात आला. याप्रकरणी पर्यटकाने हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत सोहन पाल व मंजूनाथ नाईक (वेर्ला-बार्देश) या दोघा संशयित बाऊन्सरना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर 'विराट' मात! मोडला आपलाच रेकॉर्ड; गोलंदाजांनी बजावली महत्त्वाची भूमिका

Viral Video: पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा जीवघेणा स्टंट, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Dewald Brevis Century: क्रिकेटचा नवा तारा, डेवाल्ड ब्रेव्हिसने टी-20 मध्ये शतक ठोकून रचला इतिहास, अनेक विक्रम मोडले

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तान पुन्हा हादरला! बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 पाकिस्तानी सैनिक ठार

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT