Goa Drug Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Seized: हणजूण पोलिसांची मोठी कारवाई! 'मॅजिक मशरुम'सह फ्रेंच महिलेला गोव्यात अटक; 25 लाखांचा अंमली पदार्थ जप्त

French Woman Arrested in Siolim Drugs Case: अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत हणजूण पोलिसांनी मोठी कारवाई केली. एका 43 वर्षीय फ्रेंच महिलेला अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या.

Manish Jadhav

पणजी: अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत हणजूण पोलिसांनी मोठी कारवाई केली. एका 43 वर्षीय फ्रेंच महिलेला अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या. 26 मार्च रोजी शिवोली येथील ओशेल भागात टाकलेल्या छाप्यादरम्यान ही कारवाई करण्यात आली. गाएल लुईस डॅनियल पॅव्हिलॉन (Gaelle Louise Daniele Pavillon) असे अटक करण्यात आलेल्या परदेशी महिलेचे नाव आहे. तिच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 25 लाख रुपयांहून अधिक किंमत असलेले 'मॅजिक मशरुम' आणि संबंधित अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शिवोली परिसरात सापळा रचला. संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांनी या फ्रेंच महिलेच्या स्कूटरची झडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांना 136 ग्रॅम वजनाचे सायलोसायबिन मशरुम आणि 'मॅजिक मशरुम'पासून तयार करण्यात आलेल्या चॉकलेट्सची 37 पाकिटे आढळली. या जप्त करण्यात आलेल्या चॉकलेट्सचे एकूण वजन 1.8 किलोग्रॅम इतके आहे. या सर्व अंमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे 25 लाख 80 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंमली पदार्थ बाळगणे आणि त्याची तस्करी करणे या आरोपाखाली संबंधित महिलेविरुद्ध 'एनडीपीएस' (NDPS) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपी महिलेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या पाच दिवसांच्या काळात पोलीस तिची कसून चौकशी करणार आहेत, जेणेकरुन हे अंमली पदार्थ तिने कुठून मिळवले आणि गोव्यात ती कोणाला याची विक्री करणार होती, याचा उलगडा होऊ शकेल.

उत्तर गोव्यातील (North Goa) किनारी भागात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचे 'म्युझिक' किंवा 'मॅजिक मशरुम' चॉकलेट्स विकले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. या तस्करीच्या मागे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या हणजूण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या फ्रेंच महिलेच्या इतर साथीदारांचाही शोध घेतला जात आहे. गोव्याला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस अशा प्रकारच्या कारवाया येणाऱ्या काळात अधिक तीव्र करणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

SCROLL FOR NEXT