Rape Accused Albaz Khan arrested Dainik Gomantak
गोवा

Anjuna Police: अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या आल्बाझ खानचा आणखी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पॉस्कोनुसार दुसरा गुन्हा दाखल, लग्नाच्या भूलथापा देऊन अत्याचार

Akshay Nirmale

Anjuna Police: हडफडे येथील आपल्या मैत्रिणीसोबत सहलीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर मैत्रिणीच्याच मित्राने बलात्कार केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. या प्रकरणी हणजुण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. संशयित आल्बाझ अफझल नूर अहमद खान (वय 21, सध्या राहणार कामुर्ली, मूळ राहणार कर्नाटक) याला बुधवारी पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, त्याने आणखी एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात त्याच्यावर पुन्हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी ही माहिती दिली.

संशयित आरोपी आल्बाझ खान हा आधीच बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे. या अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जवळपास एक वर्षापासून आरोपी तिचे लैंगिक शोषण करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन, म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली एलपीएसआय स्नेहा सावळ तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT