Noise Pollution Canva
गोवा

Anjuna: हणजूण येथील गुन्हे दाखल केलेल्या 20 आस्थापनांकडून कार्यवाही! CCTV, ध्वनीमापन यंत्रणा सुरु; खंडपीठाकडून सुनावणी तहकूब

Anjuna Beach: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही २० आस्थापनांची माहिती दिली.

Sameer Panditrao

पणजी: हणजूण किनारपट्टी परिसरात वारंवार ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल असलेल्या यादीतील ३६ आस्थापनांपैकी २० आस्थापनांनी सीसीटीव्ही कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक ध्वनी मोजमाप डिस्प्ले बोर्ड तसेच ध्वनी मीटर बसविले आहेत. उर्वरित आस्थापनांनाही त्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्याची माहिती दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्यामुळे अवमान याचिकेवरील सुनावणी १२ जूनपर्यंत तहकूब केली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही २० आस्थापनांची माहिती दिली. मंडळाने ११ एप्रिल २०२५ रोजी केलेल्या तपासणीत या आस्थापनांनी यंत्रणा बसविल्याचे आढळून आले आहे.

Sound Pollution Goa

१. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत या आस्थापनांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील किमान ३० दिवसांचा बॅकअप ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

२. प्रत्येक आठवड्याला आस्थापनांमध्ये वाजवण्यात येणाऱ्या संगीताच्या ध्वनीपातळीची माहिती पोलिस स्थानकात देण्यात यावी, असे बजावण्यात आले आहेत.

३. अजूनही ज्या आस्थापनांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेले नाही त्यांना त्वरित अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती उच्च न्यायालयाला प्रदूषण मंडळ तसेच सरकारी वकिलांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni: साक्षीला 'या' ठिकाणी लपून-छापून भेटत होता धोनी; औरंगाबादमध्ये खुलली कॅप्टन कूलची प्रेमकहाणी

Viral: 'Will You Marry Me?' म्हणताच... पाय घसरला अन् धबधब्यात वाहून गेला तरुण, प्रेयसीची आरडाओरडा; पाहा थरारक VIDEO

Pramod Sawant: ‘शांतीप्रिय म्हणवणाऱ्या नेहरुंनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी 14 वर्षे विलंब केला’; CM प्रमोद सावंत

Goa Live News Updates: मोठा गुंतवणूक घोटाळा उघडकीस; एकाला अटक

Blood Cancer: ब्लड कॅन्सर होण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात? कोणत्या लोकांना जास्त धोका असतो? वेळीच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT